मंत्रिमंडळाच्या बैठकीत पैनगंगा नदीवरील बंधाऱ्यास मान्यता.
मंत्रिमंडळाच्या बैठकीत पैनगंगा नदीवरील बंधाऱ्यास मान्यता
शिंदे – फडणवीस सराकरने ७८७ कोटीचा निधी उपलब्ध करुन दिल्याने खासदार हेमंत पाटील यांनी मानले आभार
यवतमाळ, दि.१४ (प्रतिनिधी) मंत्रिमंडळाच्या वतीने सोमवारी संपन्न झालेल्या बैठकीत पैनगंगा नदीवरील ११ बॅरेजेसच्या कामांना गती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यात पैनगंगा नदीवरील ११ बॅरेजेसच्या सुमारे ७८७ कोटी खर्चास मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे हिंगोली लोकसभा मतदार संघातील सात हजार ६९० हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार असल्याची माहिती खासदार हेमंत पाटील यांनी दिली असून, शिंदे – फडणवीस सरकारच्या वतीने धडाकेबाज कामगिरीचे तोंडभरुन कौतुक देखील करण्यात आले आहे.
राज्य मंत्रीमंडळाची मंगळवारी (दि.१४) बैठक संपन्न झाली. यात पैनगंगा नदीवरील ११ बॅरेजेसच्या कामांना गती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आणि यासाठी पैनगंगा नदीवरील ११ बॅरेजेसच्या सुमारे ७८७ कोटी खर्चास तत्वताह मान्यता देण्यात आली आहे. सरकारच्या या निर्णयाचे शेतकरी वर्गातुन स्वागत करण्यात येत आहे.
खासदार हेमंत पाटील यांच्या अग्रहाखातर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली १२ जानेवारी रोजी बैठक घेण्यात आली होती. यात पैनगंगा नदीवरील सात बंधारे आणि १६ पुल यास मान्यता देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समीतीकडून मान्यता देण्याचे
निर्देश संबंधित विभागाला दिले होते. त्यानंतर तीन
फेब्रुवारी २०२३ रोजी जलसंपदा विभागाच्या वतीने या बंधाऱ्यास तत्वता मान्यता दिली.
त्या पाठोपाठ मंगळवारी (दि.१४) झालेल्या मंत्री मंडळाच्या निर्णयात पैनगंगा नदीवरील ११ बॅरेजेसच्या सुमारे
७८७ कोटी खर्चास तत्वता मान्यता देण्यात आली आहे.
यामध्ये हदगाव तालुक्यातील पांगरा, बनचिंचोली,गोजेगाव, हिमायतनगर तालुक्यातील घारापूर,किनवट तालुक्यातील किनवट आणि मारेगाव तर माहूर तालुक्यातील धनोडा या सात गावांचा समावेश आहे. लवकरच या कामाला सुरुवात होणार आहे. हे प्रकल्प हिंगोली लोकसभा मतदार संघात समावेशीत असलेल्या नांदेडसह यवतमाळ जिल्ह्यातील गावांच्या पिण्याच्या पाण्याचा आणि सिंचनासाठी लाभदायक ठरणार आहेत.
कोट –
यामुळे सात हजार ६९० हेक्टर सिंचन क्षेत्र निर्माण होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे नांदेड व यवतमाळ जिल्ह्यातील सातत्याने टंचाईग्रस्त असणाऱ्या आदिवासी तालुक्याचा सिंचनाचा व दोन्ही जिल्ह्यातील अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. या प्रकल्पाचा विदर्भातील पुसद, उमरखेड, महागाव या तालुक्यासह मराठवाड्यातील कळमनुरी, हदगाव, हिमायतनगर, माहूर, किनवट या तालुक्यांना मोठ्या प्रमाणात लाभ होणार आहे. वीस दिवसापूर्वी मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली होती आणि वीसच दिवसात मंत्रीमंडळाची देखील पैनगंगेवरील बंधाऱ्यास मंजुरी देऊन भरघोस असा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. त्यामुळेच खऱ्या अर्थाने शिंदे – फडणवीस सरकार सर्व सामान्याचे सरकार म्हणून या सरकारच्या कामगिरीकडे बघितले जात आहे.