बुलढाणा अर्बन ५७ लाख रू सोने अपहार प्रकरणातील आरोपी पोलीसांचे ताब्यात पोलीस स्टेशन बिटरगांव ची दमदार कार्यवाही

बुलढाणा अर्बन ५७ लाख रू सोने अपहार प्रकरणातील आरोपी पोलीसांचे ताब्यात पोलीस स्टेशन बिटरगांव ची दमदार कार्यवाही
ढाणकी
पोलीस स्टेशन बिटरगाव येथे दि.०४/०८/२०२५ रोजी तक्रारदार सौ. मुग्धा विवेक देशपांडे (विभागीय व्यवस्थापक) बुलढाणा अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी विभाग यवतमाळ यांनी तकार दिली होती की, बुलढाणा अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी शाखा ढाणकी येधुन दि.०२/०८/२०२५ रोजी सोने तारण कर्ज पदभार असलेला कर्मचारी उमेश सुनिल वाघ रा. बेलखेड ता. उमरखेड याने रामेश्वर गजानन धुमाळे रा. बेलखेड यांचे मदतीने बुलढाणा अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी ढाणकी मधुन ३० सोने तारण पॉकीट ज्यामध्ये ५६५.१५ ग्राम सोने किमंत ५७,००,००० रू है लॉकरने कपाटमधुन दि. १५/०७/२०२५ ते दि. ०३/०८/२५ या दरम्यान चोरी करून अपहार केला व सदरचे सोने घेवुन दोन्ही आरोपी फरार झाले अशा तक्रारीवरून पोलीस स्टेशन बिटरगांव येथे अप.न. १७९/२५ कलम ३१६ (५),३१८ (३), ३१८ (४), ३१९ (२), ३(५) भारतीय न्याय संहीता प्रमाणे गुन्हा नोंद आहे.
सदर गुन्हयाचे गांर्षीय पाहुन मा. पोलीस अधिक्षक श्री कुमार चिंता सा. यांच्या सुचनेप्रमाणे सपोनि पांडुरगं शिंदे ठाणेदार बिटरगांव यांनी आरोपी शोध कामी पथक नेमले त्यात पोउपनी सागर अन्नमवार, पोकों/९५२ प्रविण जाधव, पोकों / ११४१ रावसाहेब मरके यांची नेमनुक करण्यात आली होती त्याप्रमाणे गोपणीय माहीती व सायबर सेल यवतमाळ यांचे मदतीने गुन्हयातील फरार आरोपी १) उमेश सुनिल वाघ २) रामेश्वर गजानन धुमाळे रा. बेलखेड ता.उमरखेड यांना दि.२१/०८/२०२५ रोजी पिंपरी चिंचवड पुणे येथुन ताब्यात घेण्यात आले त्याकरीता पोस्टे पिंपरी येथील पोउपनी चिरंजिव दलालवाड यांचे पथकाचे सहकार्य लाभले. दोन्ही आरोपीस पोलीस स्टेशन बिटरगांव येथे आणुन तपास केला व आरोपीने गुन्हयात चोरी केलेल्या ५५५.१५ ग्राम सोने किमंत ५७,००,०००/- रू पैकी ५४१.१५ ग्रॅम सोन किंमत अंदाजे ५५,१९७३०/- रूपयेया मुद्देमाल व गुन्हयात आरोपीने वापरलेली मोसा वाहण जप्त करण्यात आली आहे. व आरोपी याना कोर्टापुढे हजर केले असता कोटनि दिवासाची पोलीस कष्टडी रिमांड मंजुर केला आहे.
सदर ची कार्यवाही मा.पोलीस अधिक्षक यवतमाळ कुमार चिंता सा.मा.अपर पोलीस अधिक्षक मा अशोक बोरात सा, उपविभागीय पोलीस अधिकारी मा. हनुमंत गायकवाड सा यांचे मार्गदर्शनात सहा. पोलीस निरीक्षक पांडुरंग शिदे पोउपनि सागर अन्नमवार, पोहेकों रवि गिते, राहुन कोकरे, दत्ता हीगांडे, मोहन चाटे, पोलीस शिपाई प्रविण जाधव, रावसाहेब मस्के, प्रकाश मुळे यानी यशस्वीरित्या पार पाडली पुढील तपास सपोनी पांडुरंग शिदि व पोउपनि सागर अन्नमवार हे करत आहेत.