ट्युशन टिचर च्या कृत्याने अल्पवयीन मुलीचा बळी आरोपी अटकेत

youtube

ट्युशन टिचर च्या कृत्याने अल्पवयीन मुलीचा बळी
आरोपी अटकेत

उमरखेड –

शिक्षण द्यायचं आणि भविष्य घडवायचं काम शिक्षकाचं असतं. पण उमरखेड तालुक्यातील ढाणकी गावात एका ट्युशन शिक्षकाने आपल्या विकृत वागणुकीमुळे १७वर्षीय विद्यार्थिनीचं आयुष्य उद्धवस्त केलं. दीर्घकाळ चाललेल्या शारीरिक शोषणामुळे ती अल्पवयीन पीडिता गर्भवती झाली. उपचार सुरू असताना नांदेडच्या शासकीय रुग्णालयात तिची प्राणज्योत मालवली. ही घटना दि. 01 डिसेंबर 2024 ते 19 सप्टेंबर २०२५दरम्यान घडली. या धक्कादायक घटनेमुळे परिसरात संताप उसळला आहे.

या प्रकरणी ढाणकी येथील आरोपी संदेश गुंडेकर (वय २७) याला भोकर येथून गुप्त

विद्यादान करायचे सोडून नको ते कृत्य

गावातील खाजगी ट्युशनमध्ये शिकत असताना आरोपीने विद्यार्थिनीशी मैत्री करत तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर वारंवार क्लासरूममध्येच तिच्यावर शारीरिक अत्याचार करण्यात आले. पीडिता गर्भवती झाल्यानंतर तिला नांदेड येथे उपचारासाठी नेण्यात आले. मात्र अखेरीस तिचा मृत्यू झाला.

माहितीच्या आधारे पोलिसांनी ताब्यात घेतले. फिर्यादी अल्पवयीन मुलीच्या जबाबावरून पोलीस स्टेशनमध्ये अप.क्र. २११/२०२५, कलम ६४ (२) (एफ) (आय) (एम) भा.दं.सं. सहकलम ४, ६ पोक्सो कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला. आरोपीला अटक करण्यात आली असून, पुढील तपास ठाणेदार पांडुरंग शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. उपनिरीक्षक सागर अनमावर व पोका रावसाहेब मस्के करीत आहेत.

Google Ad
Google Ad

1 thought on “ट्युशन टिचर च्या कृत्याने अल्पवयीन मुलीचा बळी आरोपी अटकेत

  1. Hi there just wanted to give you a quick heads up. The text in your content seem to be running off the screen in Firefox. I’m not sure if this is a format issue or something to do with web browser compatibility but I thought I’d post to let you know. The design and style look great though! Hope you get the problem resolved soon. Many thanks

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!