दहा लाख रुपयाची रोकड घेऊन फरार झालेल्या भारत फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यास अटक

youtube

दहा लाख रुपयाची रोकड घेऊन फरार झालेल्या भारत फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यास अटक

( स्थानिक गुन्हे शाखा व सायबर सेलची संयुक्तिक कार्यवाही ).

उमरखेड ;
यवतमाळ जिल्हयात कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे सुरु राहणार नाही तसेच अ-उघड गुन्हे, आरोपी शोध, अवैध धंदयाचे समुळ उच्चाटन व्हावे याकरीता मा. पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांनी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांना आदेशीत केले होते. त्याच अनुषंगाने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी त्याचे अधिनस्थ पथकांना गोपनिय माहीती काढून वरील गुन्हयातील पाहीजे व फरार आरोपी शोध घेणे चे सुचना देवून आदेशित केले होते. पोलीस स्टेशन उमरखेड अप क्रमांक 178/2024 कलम 408, 409 भादवि मधील फिर्यादी यांनी विश्वासाने

आरोपी विद्यासागर पिराजी पिंगळे यास भारत फायनस कंपनीची रक्कम 10,03,274/-रु (दहा लाख तिन हजार चौ-यात्तर रुपये) बँकेत जमा करण्याकरीता दिली असता आरोपी यांनी सदरची रक्कम स्वतःचे फायदया करीता घेवून अपहार करुन दि. 14/03/2024 रोजी पळून गेला अशा तक्रारी वरुन वरील प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. सदर गुन्हयातील आरोपी चा उमरखेड, पुणे, सोलापूर, लातुर, नांदेड, निजामाबाद, हैद्राबाद, या भागात शोध घेतला परंतू आरोपी हा वेळोवेळी त्याचे राहण्याचे ठिकाण बदल असल्याने कोणताही सुगावा लागत नव्हता. सदर आरोपी यास अटक करण्याकरीता, सायबर सेल यवतमाळ यांची मदत घेवून त्याचेसह तपास करण्याबाबत वरिष्ठांनी वेळोवेळी सुचना दिलेल्या होत्या.

दिनांक 25/03/2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व सायबर सेल यवतमाळ हे सदर गुन्हयातील आरोपी यांचा तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे 1500 किलो मिटर पाठलाग करुन अतिशय जिध्द व चिकाटीने पोलीस कौशल्याचा वापर करुन शोध घेत असतांना गोपनिय बातमीदारा मार्फत व तांत्रीक दृष्टया प्राप्त माहीती वरुन आरोपी विद्यासागर पिराजी पिंगळे हा त्याच्या मैत्रिणीला भेटण्याकरीता नांदेड येथील कलामंदीर परिसरात येत असल्याबाबत माहीती मिळाल्याने नमूद खालील अधिकारी व अंमलदार यांनी तात्काळ आरोपी शोध कामी नांदेड येथे रवाना होवून आरोपीच्या शोध घेवुन आरोपी विद्यासागर पिराजी पिंगळे वय 25 वर्षे, रा. चिरली ता. बिलोली जि. नांदेड हा कलामंदीर नांदेड येथे मिळून आल्याने त्यास ताब्यात घेवून विचारपूस केली असता त्याने गुन्हा केल्याचे कबूल केल्याने पंचा समक्ष त्याची व त्याचे सोबत असलेल्या बॅगची झडती घेतली असता त्याचे कडून अपहार केलेली रोख रक्कम व मुददेमाल असा एकूण 10,02,250/- मुददेमाल जप्त करुन ताब्यात घेवून पुढील कारवाई करीता उमरखेड पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात दिले.

सदरची कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनात पोनि/ अधारसिंग सोनुने, स्थागुशा यवतमाळ, पोनि अरुण परदेशी, सायबर सेल, सपोनि, गजानन गजभारे, स्थागुशा यवतमाळ, सपोनि/अमोल पुरी सायबर सेल, पोउपनिरी शरद लोहकरे, चापोउपनिरी रविंद्र श्रीरामे, चापोउपनि रेवन जागृत पोहवा तेजाब रंणखांब, पोहवा सुभाष जाधव, पोहवा कुणाल मुंडोकार, पोहवा रमेश राठोड, पोशि मोहम्मद ताज, स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ, मपोहवा आर्पीता चौधरी, पोना प्रविण कुथे, पोशि अजय निंबोळकर, अभिनव बोन्द्रे, अविनाश शहारे, सचिन देवकर, मपोशि प्रगती कांबळे मपोशि पुजा भारस्कर सायबर सेल यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.

Google Ad
Google Ad

4 thoughts on “दहा लाख रुपयाची रोकड घेऊन फरार झालेल्या भारत फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यास अटक

  1. I loved as much as youll receive carried out right here The sketch is tasteful your authored material stylish nonetheless you command get bought an nervousness over that you wish be delivering the following unwell unquestionably come more formerly again since exactly the same nearly a lot often inside case you shield this hike

  2. I loved as much as you will receive carried out right here The sketch is tasteful your authored subject matter stylish nonetheless you command get got an edginess over that you wish be delivering the following unwell unquestionably come further formerly again as exactly the same nearly very often inside case you shield this hike.

  3. I loved as much as youll receive carried out right here The sketch is attractive your authored material stylish nonetheless you command get bought an nervousness over that you wish be delivering the following unwell unquestionably come more formerly again as exactly the same nearly a lot often inside case you shield this hike.

  4. Wonderful beat I wish to apprentice while you amend your web site how could i subscribe for a blog web site The account aided me a acceptable deal I had been a little bit acquainted of this your broadcast provided bright clear idea.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!