कब बुलबुल पथकाद्वारे घडले कलादर्शन.
कब बुलबुल पथकाद्वारे घडले कलादर्शन
उमरखेड –
अंबोना तलाव परिसरातील विनायक दामोदर इंग्लिश मेडियम स्कुल उमरखेडच्या निसर्गरम्य वातावरणात भारत स्काऊट गाईड च्या वतीने 27 वा तालुकास्तरीय कब बुलबुल मेळावा नुकताच संपन्न झाला. या मेळाव्यात 11 कब व 21 बुलबुल पथकांनी उत्स्फूर्तपणे आपला सहभाग नोंदविला. याप्रसंगी विविध स्पर्धांच्या माध्यमातून आपल्यातील सुप्त कलागुणांचे सादरीकरण सहभागी विद्यार्थ्यांनी केले.
उपस्थितांचे स्वागत तालुका कबमास्टर डॉ. विनय चव्हाण राम पाचकोरे,दिगंबर तडोळे यांच्या मार्गदर्शनाखाली बडी सलामी देऊन करण्यात आले. स्वागत प्रसंगी उपस्थितांचे लक्ष शाळेतील प्रवेशद्वारावर रेखाटलेल्या समयोचित रांगोळीने वेधले.
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून गटशिक्षणाधिकारी सतीश दर्शनवाड, माजी सैनिक मुडे,केंद्रप्रमुख अनिल बोपिनवार,संतोष घुगे, राहत अन्सारी,सुरेश वाघ,शाळेचे मुख्याध्यापक भारत कुलकर्णी, मेळावा समन्वयक उत्तमराव दळवी, संस्थेचे संचालक महेश काळेश्वरकर, बाळासाहेब देशपांडे, राजाभाऊ देशपांडे, कांताभाऊ लिगदे आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांनी स्काऊट गाईडचे जनक लॉर्ड बेडन पावेल व लेडी बेडन पॉवेल यांच्या प्रतिमेचे पूजन केले. सोबतच स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांनाही वंदन करण्यात आले.
या मेळाव्यात विद्यार्थ्यांनी विविध साहसी खेळांचे प्रात्यक्षिक दाखविले. प्रारंभी लेखी, चित्रकला व हस्तकला स्पर्धा घेण्यात आली. त्यानंतर कब बुलबुलचे नियम, वचन, ध्येय, झंडागीत, दोरीवरील उड्या, बेडूक उडी,दोरीच्या गाठी व उपयोग,गणवेश निरीक्षण, वेळ व दिशा ओळखणे, स्मरणशक्ती स्पर्धा व सोबतच मनोरंजक असा मोगली चा खेळ घेण्यात आला. लेखी, तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षेद्वारे सहभागी स्पर्धकांचे मूल्यांकन करण्यात आले.
कब विभागातून साकळे प्राथमिक शाळा उमरखेडचा प्रथम,राष्ट्रसंत विद्यानिकेतन शाळा द्वितीय तर युनिव्हर्सल इंग्लिश मीडियम स्कूल उमरखेड ने तृतीय क्रमांक पटकाविला. बुलबुल विभागातून जि.प.उ.प्रा.शाळा नागापूर प. प्रथम,राष्ट्रसंत विद्यानिकेतन उमरखेड द्वितीय तर जि.प. प्रा.शाळा कैलासनगर यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. सहभागी सर्व पथकांना मान्यवरांच्या हस्ते गौरवचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी दिगंबर तडोळे यांच्या नेतृत्वात धानोरा येथील स्काऊट पथकाने आपला विशेष सहभाग मेळावामध्ये नोंदविला.
बक्षीस वितरण प्रसंगी उमरखेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रवीणकुमार वानखेडे, सहाय्यक गटविकास अधिकारी गजानन पिल्लेवाड,गटशिक्षणाधिकारी सतीश दर्शनवाड, विस्तार अधिकारी पांडुरंग खांडरे, मुंडे,केंद्रप्रमुख ज्ञानेश्वर गायकवाड, संस्थेचे अध्यक्ष गिरीश देशमुख, संचालक मनोज पांडे, गणेश शिंदे, मंगल पांडे प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी उमरखेड तालुका शिक्षक सहकारी पतसंस्थेने मेळाव्यासाठी अनमोल सहकार्य केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विनायक मुळावकर, प्रकाश महेशकर, किशोर कदम,कृष्णा पाचकोरे,गोविंद घुले, दिलीप जाधव, सुनील यशवंत, रामकिशन गुद्दे, परमेश्वर लांडगे, बालाजी तिवरंगकर, पांडुरंग कनकापुरे, नितीन वान्नरे, संजय इप्पर, तानाजी
मार्लेवाड,एस.डी.शहाणे, शिवाजी राठोड, नागनाथ गर्दसवार, सविता आसोले, छाया चाकोरे, कुलथे, सुनिता जाधव, सुनंदा शिंदे, संगीता धामणकर, क्रांती पवार, सिंधू चव्हाण, पुण्यरथा नगारे, सविता शिंदे,हर्षदा अन्नदाते, पुष्पा जायभाये,माधुरी बोकडे, जयश्री कांदे, कल्पना आघाव, रूपाली कुलकर्णी, मनीषा वैद्य, डी.एन. पातंगवार, संगीता मांजरे, शाळेचे शिक्षक अनिता पांडे, रश्मी पांडे, सुवर्णा चौधरी, नूतन काळे, अर्चना खडसे, कल्याणी काळे, जयश्री माने, शुभम अयाचीत,अक्षय टिपरे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. मेळाव्याला मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादाबद्दल परिसरातून सहभागी झालेल्या सर्व कबमास्टर व फ्लाकलीडरचे तालुका कबमास्टर डॉ.विनय चव्हाण यांनी विशेष आभार मानले. कार्यक्रमाचे संचालन गोविंद घुले व रामकिशन गुद्दे यांनी केले तर आभार दिगंबर तडोळे यांनी मानले.
Your article helped me a lot, is there any more related content? Thanks! https://www.binance.info/zh-TC/join?ref=V3MG69RO
Your article gave me a lot of inspiration, I hope you can explain your point of view in more detail, because I have some doubts, thank you.