अल्पवयीन मुलीस फूस लावून, पळवून नेणाऱ्या आरोपीला पुणे येथून अटक ढाणकी

youtube

अल्पवयीन मुलीस फूस लावून, पळवून नेणाऱ्या आरोपीला पुणे येथून अटक

ढाणकी

उमरखेड तालुक्यातील ढाणकी येथील एका अल्पवयीन मुलीला फूस लावून, पळवून नेणाऱ्या आरोपीला पोलिसांनी पुण्यावरून अटक केले. पंधरा दिवस अगोदर फिर्यादी यांनी आमची मुलगी कोणीतरी अज्ञात इसमाने फूस लावून पळवून नेले आहे, अशी तक्रार बिटरगाव पोलीस स्टेशन येथे दिली होती या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध तक्रार दाखल करून तपासाची चक्रे फिरविली असता, शुभम तरटे रा. ढाणकी याने मुलीस फ स लावून पळवून नेल्याचे स्पष्ट होताच. सायबर सेलच्या

मदतीने मुलगी आणि आरोपी हे पुणे या ठिकाणी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली या माहितीच्या आधारे पोलिस निरीक्षक कैलास भगत यांच्या मार्गदर्शनात पोलिस उप निरीक्षक शिवाजी टिपूर्णे, जमादार रोशन सरनाईक, पो. कॉ निलेश भालेराव व पो. कॉ रवि गिते यांनी पुणे येथून मुलगी आणि आरोपीला ताब्यात घेतले मुलीच्या बयान वरून आरोपी विरुद्ध कलम २), ६४ (१),६४ (२), (ख), (1), इछड, ४,६ पोस्को क्ट या नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील प्रकरणाचा तपास पोलिस उप निरीक्षक शिवाजी टिपूर्णे यांचेकडे देण्यात आले आहे.

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!