संत नगरी शेगाव येथे 9 व 10 एप्रिल या दोन दिवशी भाविकांची मांदियाळी- हजारो भक्तगण यांनी घेतले जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांचे दर्शन.

youtube

संत नगरी शेगाव येथे 9 व 10 एप्रिल या दोन दिवशी भाविकांची मांदियाळी- हजारो भक्तगण यांनी घेतले जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांचे दर्शन.

 

शेगांव –

जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या अंधश्रद्धा निर्मूलन उपक्रमांतर्गत अंनत श्री विभूषीत जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज जगद्गुरु रामानंदाचार्य दक्षिण पीठ नाणीजधाम यांचा 9 व 10 एप्रिल अशा दोन दिवसीय समस्या मार्गदर्शन व दर्शन सोहळ्याचे आयोजन शहरातील गणेश प्रस्थ मंगल कार्यालय, खामगाव रोड शेगाव या ठिकाणी करण्यात आले होते. रविवार दिनांक 9 व सोमवार दिनांक 10 एप्रिल 2023 या दोनही दिवशी सकाळी नऊ वाजता जगद्गुरुश्रींचा समस्या मार्गदर्शन व दर्शन सोहळ्याचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.यावेळी सुवासिनी यांनी जगद्गुरुश्रींचे पाद्यपूजन करून औक्षण केले व त्यानंतर परमपूज्य गुरुमाऊलींचे संत पिठावरती आगमन झाले. यावेळी जगद्गुरुश्री भक्तगणांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, जीवनात गुरुची नितांत आवश्यकता असून ज्यांना गुरु सानिध्य लाभले त्यांच्या जीवनाचे नक्कीच सोनं झाल्याशिवाय राहणार नाही असे सांगून विज्ञानाने केली क्रांती तरी, अध्यात्मा शिवाय नाही मन:शांती! आपली दृष्टी विज्ञानवादी ठेवा, बुद्धी व्यवहारवादी असू द्या, मन मात्र अध्यात्मावादी ठेवा. या त्रीसूत्रीने जीवन जगल्यास नक्कीच आपण समाधानाने जीवन जगू शकतो व आपल्या जीवनाचे सोने होते. तसेच तुम्ही जगा, दुसऱ्यांना जगवा या दिव्य संदेशानुसार समाजातील दुःख पीडितांची मदत व सेवा केल्यास नक्कीच भगवंत आपल्यावर प्रसन्न होईल आणि तीच खरी भगवंताची सेवा आहे असे प्रतिपादन जगद्गुरुश्रींनी केले.या कार्यक्रमासाठी अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम नांदेड, जळगाव, जालना, औरंगाबाद इत्यादी जिल्ह्यांमधून जवळपास रविवार रोजी 20 ते 25 हजार व सोमवार रोजी 25 ते 30 हजार भाविक भक्तगण आपल्या लाडक्या जगद्गुरुश्रींच्या दर्शनासाठी व प्रवचनाचा लाभ घेण्यासाठी उपस्थित होते. श्री गणेश प्रस्थ मंगल कार्यालयापासून ते शेगाव रेल्वे स्टेशन पर्यंत लांबच लांब भक्तगणांच्या रांगा दर्शनासाठी लागलेल्या होत्या.जगद्गुरुश्रींच्या दर्शनासाठी भक्तगण तसेच राजकीय व सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवरांनी उपस्थिती लावून दर्शनाचा व प्रवचनाचा लाभ घेतला. अशी माहिती पश्चिम विदर्भ पीठ प्रमुख श्री कुंडलिकराव वायभासे, पीठ सहप्रमुख श्री देवेंद्र दलाल, व्यवस्थापक श्री सुरेश मोरे, यवतमाळ पूर्व जिल्हा निरीक्षक गोविंद उपासे ,सर्व जिल्हा निरीक्षक, जिल्हाध्यक्ष, पीठ समिती सदस्य यांनी दिली.
या समस्या मार्गदर्शन व दर्शन सोहळयासाठी आलेल्या भाविकांसाठी दिवसभर शुद्ध पिण्याच्या पाण्याची व महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. सर्व भाविकांनी उपस्थित राहून परमपूज्य जगद्गुरुश्रींच्या प्रवचनाचा व दर्शनाचा लाभ घेतला. दुसऱ्या दिवशी गुरुमाऊली यांची सांगता आरती घेऊन दोन दिवसीय कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. हा दोन दिवसीय समस्या मार्गदर्शन व दर्शन सोहळा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आश्रम सेवा समिती सेवेकरी, सर्व पिठ समिती सदस्य, सर्व जिल्हा निरीक्षक व सर्व जिल्हाध्यक्ष, सर्व तालुकाध्यक्ष, जिल्हा समिती सदस्य, तालुका समिती सदस्य, सेवा केंद्र समिती, सर्व भक्त, साधक, शिष्य, गुरु सेवक, प्रोटोकॉल अधिकारी,प्रवचनकार, महिला सेना, हिंदू संग्राम सेना, युवासेना, आजी – माजी पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी प्रचंड मेहनत घेतली.

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!