महात्मा फुले हायस्कूल नाईकनगर येथील शाळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त कार्यक्रम.

youtube

महात्मा फुले हायस्कूल नाईकनगर येथील शाळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त कार्यक्रम

नांदेड ( प्रतिनिधी ) येथील महात्मा फुले प्राथमिक शाळा व महात्मा फुले हायस्कूल नाईक नगर नांदेड येथील शाळेत दिनांक 14 एप्रिल 2023 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक श्री भारत माधवराव कलवले यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री व्ही.एम.खवास पाटील सर यांनी केले.सकाळी ठीक 8 वाजता अभिवादन व व्याख्यान कार्यक्रम घेण्यात आल्यानंतर विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संपुर्ण आयुष्यभर उपेक्षित माणसासाठी लढाई करून सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्याचे सामाजिक कार्य केले म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सत्ता,संपत्ती व प्रसिद्धीपासून दुर्लक्षित उपेक्षित माणसाचा सन्मान झाला पाहिजेत असे प्रतिपादन श्री भारत कलवले यांनी केले. या कार्यक्रमास शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष माननीय अमोलभाऊ केंद्रे साहेब उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून वानखेडे होस्टेल चे संचालक प्रा. मोहन वानखेडे सर , सात्विक होस्टेल चे संचालक प्रा.नागनाथ येवतीकर सर ,संचालक ऑडहोकेट नितेश लोणे साहेब , बंजारा हॉस्टेलचे संचालक श्री संतोष राठोड सर, समाजसुधारक महात्मा गांधी वसतिगृहाचे अधिक्षक श्री संदीप घोडजकर सर, विजयसिंह होस्टेल चे अधिक्षक श्री पवार सर, शिक्षण विकास मुलींचे वसतिगृह संचालक सौ. फुलाताई वाघमारे, सुगत होस्टेल चे अधिक्षक श्री सतिश डोंगरे सर, शिवाजी बोयवारे सर यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रशस्तीपत्र पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.परिसरातील नागरिक , पालक व वसतिगृहातील विविध मान्यवरउपस्थितहोते. उपस्थितीतांचे आभारप्रदर्शन श्री एम.एन.गुंटूरकर यांनी मानले.

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!