हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे”स्वच्छ व सुंदर बस स्थानक अभियान स्पर्धात्मक स्वरूपात लोकसहभागातून राबविण्या बाबत. रा.प.उमरखेड आगारातर्फे आयोजित बैठक संपन्न

“हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे”स्वच्छ व सुंदर बस स्थानक अभियान स्पर्धात्मक स्वरूपात लोकसहभागातून राबविण्या बाबत. रा.प.उमरखेड आगारातर्फे आयोजित बैठक संपन्न ..
उमरखेड
महाराष्ट्र शासना तर्फे “हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बस स्थानक अभियान” हे लोक सहभागातून स्पर्धात्मक अभियान 2025 मध्ये राबविल्या जात आहे.या अभियानाच्या अनुषंगाने आज दिनांक 08/04/25 रोजी लक्ष्मी कम्प्युटर वसंत नगर उमरखेड येथे रा.प.उमरखेड आगारातर्फे बैठकीचे आयोजन करण्यात आले.भाजपा जिल्हा समन्वयक मा.श्री.नितीनभाऊ भुतडा यांच्या अध्यक्षतेखाली उमरखेड येथील सर्व प्रशासकीय अधिकारी,लोकप्रतिनिधी,विविध बँकेचे प्रतिनिधी, विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी तसेच मेडिकल असोसिएशनचे प्रतिनिधी, व्यापारी संघाचे प्रतिनिधी आणि पत्रकार हे सर्व मान्यवर बैठकीस उपस्थित होते. सदर बैठकीमध्ये उमरखेड बस स्थानक कशाप्रकारे स्वच्छ,सुंदर आणि आकर्षित बनविण्यात येईल यासाठी सर्वांच्या विचारधारेतून वेगवेगळ्या कल्पना मांडण्यात आल्या.आपले मनोगत व्यक्त करताना मा.केदार कोंडे एसबीआय बँक मॅनेजर यांनी या अभियानाला शुभेच्छा दिल्या आणि आपल्या स्टाफ तर्फे दहा हजार रुपये आर्थिक मदत देण्याचे कबूल केले. त्यानंतर रोटरी क्लबचे अध्यक्ष मा. गंगासागर यांनी प्रवाशांना पिण्याच्या पाण्यासाठी वॉटर प्युरिफायर देण्याचे कबूल केले,त्यानंतर इनरव्हील क्लबच्या वतीने बस स्थानकावर कचराकुंड्या आणि रोपटे लावण्याकरिता कुंड्या देण्याचे कबूल केले, ओम जी सारडा यांच्या वतीने जेवढे लागतील तेवढे फ्लेक्स आणि बॅनर देण्याचे कबूल केले, सरोज ताई देशमुख यांनी प्रवाशांना बसण्याकरिता बेंच तसेच चौकशी कक्षावर लावण्याकरिता घड्याळ देण्याचे कबूल केले. चर्चेमध्ये सहभागी झालेल्या सर्वांनीच सहकार्य करून आपले उमरखेडचे बस स्थानक महाराष्ट्र मध्ये नंबर एक वर येण्याकरिता प्रयत्नशील राहू असे आश्वासन दिले. सदर बैठकीचे अध्यक्ष व स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियान समितीचे अध्यक्ष नितीन भुतडा यांनी आपले उमरखेडचे बस स्थानक महाराष्ट्र मध्ये नंबर वन आलेच पाहिजे याकरिता हव्या त्या प्रकारे मदत करून बस स्थानक स्वच्छ आणि सुंदर बनविण्यासाठी सर्व मिळून प्रयत्न करू. असे आश्वासित केले. आणि सदर अभियानाच्या माध्यमातून उमरखेड आगारातील कर्मचाऱ्यांचे व आगार व्यवस्थापिका यांचे सुद्धा अभिनंदन केले…
सदर बैठकीचे सूत्रसंचालन दिलीप भंडारे य तर प्रस्ताविकेच्या माध्यमातून सदर अभियाना विषयीची संपूर्ण माहिती आगाराच्या व्यवस्थापिका सौ. प्रबोदनी किनाके यांनी सादर केली. बैठकीस उपस्थित माननीय अध्यक्ष व सर्व प्रमुख अतिथींचे रा.प.उमरखेड आगाराच्या वतीने भरत वाठोरे यांनी मनपूर्वक आभार व्यक्त केले…
सदर बैठकीच्या यशस्वीतेसाठी सुधीर भाऊ कोडगिरे, चीट्टेबोईनवाड ,पाटील ,श्रीराम तिवारी, अमोल सोळंके,ज्ञानेश्वर कऱ्हाळे,संतोष कदम,मार्कड रणमले मश,शिल्पा,बंटी टाक,शेख मदार,राजू भांगे, जगदीश राठोड.. या सर्वांनी अथक परिश्रम घेतले