लवजिहाद विरोधात उमरखेड शहर कडकडीत बंद व  जनआक्रोश मोर्चा. 

youtube

लवजिहाद विरोधात उमरखेड शहर कडकडीत बंद व
जनआक्रोश मोर्चा

प्रतिनिधी
उमरखेड :
लवजिहादच्या विरोधात आज उमरखेड शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला तर यावेळी स्थानीक छत्रपती शिवाजी महाराज चौकातून बजरंग दलाच्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला .
दिनांक 26 डिसेंबर रोजी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात हजारोच्या संख्येने हिंदू बांधव व विविध सामाजिक संघटनेच्या वतीने लव जिहाद विरोधी आणि धर्मांतरण बंदी कायदा व गो हत्या बंदी कायदा अशा विविध मागण्यासहस्थानिक छत्रपती शिवाजी महाराज चौकात हिंदू गर्जना मोर्चाद्वारे जन आक्रोश मोर्चा ची सुरुवात करत शहरातून मोर्चा काढत उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे निवेदन देण्यात आले .
लव जिहाद विरोधी कायदा तसेच धर्मांतरण बंदी कायदा झाला पाहिजे या मागणीसाठी आज सकल हिंदू समाजाच्या वतीने उमरखेड येथे हिंदू गर्जना जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला या मोर्चात हिंदूवादी संघटना तरुण-तरुणी महिला यांचा सहभाग झाल्याने विविध घोषणांच्या निनादात शहरातील प्रमुख मार्गावरून हा मोर्चा काढण्यात आला आज सकाळी दहा पासूनच छत्रपती शिवाजी महाराज चौकात या मोर्चासाठी तरुण कार्यकर्ते हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते एकत्र येऊ लागले व दुपारी दोन वाजताच्या सुमारास या मोर्चाला सुरुवात झाली .
लव जिहाद विरोधी कायदा संपूर्ण राज्यात अमलात आणण्यासाठी संपूर्ण हिंदुत्ववादी कार्यकर्ते व येथील व्यापारी संघटनेच्या वतीने संपूर्ण बाजार कडकडीत बंद ठेवून या मोर्चेला समर्थन देण्यात आले .
उमरखेड शहर येथे प्रथमच हिंदुत्वाचा हा ऐतिहासिक मोर्चा असल्याने .या कार्यक्रमात बजरंग दलचे जिल्हाध्यक्ष तसेच विविध सनातनवादी धार्मिक महाराजांनी हिंदू मुली मुलांचे आयुष्य उध्वस्त करणाऱ्यांना पैसे दिले जातात व हिंदू मुलींचा छळ केला जातो असे कार्यक्रमातून बोलण्यात आले. यानंतर असा प्रकार घडल्यास हिंदू समाज अशांना ठेचून काढल्याशिवाय राहणार नाही पैसे देऊन जबरदस्तीने धर्मांतर करण्याचा प्रयत्न करू नका हिंदुस्थानाचा पाकिस्तान करू देणार नाही अशी घोषणा देत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना निवेदनातून तातडीने लव्ह जिहाद विरोधी तसेच धर्मांतरण बंदी कायदा करावा व फसवणूक करणाऱ्या वर कठोर कारवाई करावी असे विविध सामाजिक संघटनेच्या वतीने सांगण्यात आले .
तसेच दिल्ली येथे श्रद्धा वालकर या हिंदू मुलीचा आफताब पूनावाला या विकृत मनोवृत्तीच्या क्रूरकर्मा जीहाद्याने निघृण खून केला या हत्येचा खटला जलद गती न्यायालय चालवून सदर विकृत मनोवृत्तीच्या क्रूरकर्म्यास भर चौकात फाशी द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली वरील बाबीचे निवेदन उपविभागीय अधिकारी यांचे मार्फत महामहीम राष्ट्रपती यांना सादर करण्यात आले सदरील मोर्चाचे आयोजन विश्व हिंदू परिषद प्रेषित बजरंग दल, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास अभिवादन समिती व हिंदू बांधव यांनी केले होते

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!