उमरखेड आगारात जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला

उमरखेड आगारात जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला
उमरखेड –
माता सावित्रीबाई यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली आणि उपस्थित मान्यवरांना व आगारात काम करणाऱ्या महिलांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्त्या सरोजताई देशमुख यांनी आपल्या मनोगतता सांगितले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पाठीमागे माता रमाई या खंबीरपणे उभा होता आणि त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घडले त्यांनी भारतीय संविधानात महिलांना हक्क अधिकार बहाल केले त्यामुळे आज आपण महापुरुषांच्या संघर्षामुळेच आज आपल्याला सन्मानाने जागतिक महिला दिन साजरा करण्याची संधी मिळाली आहे
तर सविता पाचकोरे भारतीय संविधानामुळे आज आपल्याला मतदानाचा हक्क अधिकार शिक्षण आणि राजकारणात संधी मिळाली आहे असे मनोगत व्यक्त केले
व पत्रकार सविताताई चंद्रे यांनी महिला आता सर्व क्षेत्रात भाग घेत असून आज मी लोकशाहीचा चौथा स्तंभ समजला जाणारा पत्रकारिता म्हणून काम करत आहे आणि समाजाच्या हक्क आणि अधिकारासाठी संविधानाने दिलेला मला अधिकाराचा वापर करून समाजाचे प्रश्न मी आज पत्रकारितेतून मांडत आहे.
तसेच आगार व्यवस्थापक प्रमोदिनी किनाके यांनी आपले मनोगतात माता सावित्रीबाई फुले यांनी महिलांना शिक्षणाचे द्वार खुले करून दिल्यामुळे आज महिलांची प्रगती झाली आहे आणि डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानात ते हक्क अधिकार बहाल केले त्यामुळे आज आम्हाला त्यांच्या संघर्षामुळे सन्मानाने जगण्याची संधी मिळाली आज पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याची संधी आज मिळत आहे आगर मोरे ,माने, ढगे, पाटील यांनी मनोगत व्यक्त केले या वेळी आगारा च्या पहिल्या महिला वाहक म्हणून देशमुख यांचा सत्कार करण्यात आला या वेळी बसस्थानक परिसरातील स्वच्छते चे कामकाज करणाऱ्या बेबीताई गवंडे यांचा सत्कार करण्यात आला
आगारात जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा
करण्या साठी आगारातील सर्व पुरुष वर्ग यांनी महत्वाची भूमिका बजावली आणि कार्यक्रम चे नियोजन करून यशस्वी कार्यक्रम पार पाडला
या कार्यक्रमास अध्यक्ष प्रबोदनी किनाके ,प्रमुख पाहुणे सरोज देशमुख ,सविता पाचकोरे ,सविता चंद्रे ,देशमुख ताई ,पाटील ताई व आगारातील सर्व महिला वाहक महिला लिपिक तसेच यांत्रिक महिला स्वच्छक महिला कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थितीत होत्या..या कार्यक्रमाची प्रस्ताविका कांगणे व सूत्रसंचालन राहुल गायकवाड तर आभार दिलीप भंडारे यांनी केले…