भविष्यातील करीअरच्या संधीवर मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न उमरखेड येथील गोपिकाबाई सीताराम गावंडे महाविद्यालय

youtube

भविष्यातील करीअरच्या संधीवर मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न

उमरखेड

येथील गोपिकाबाई सीताराम गावंडे महाविद्यालयाच्या प्लेसमेंट सेलच्या वतीने “भविष्यातील करिअरच्या संधी” या विषयावर एक महत्त्वपूर्ण कार्यशाळा 5 ऑगस्ट 2025 रोजी आयोजित करण्यात आली. नागपूरच्या टेक्नोगेट नॉलेज सोल्युशन कंपनीचे संचालक
सचिन बर्डे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते.
या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या व्यावसायिक वाटचालीसंदर्भात उपयुक्त मार्गदर्शन मिळाले. त्यांनी उदयोन्मुख उद्योग, आवश्यक कौशल्ये आणि विकसित होत असलेल्या नोकरीच्या संधींविषयी सखोल माहिती दिली. त्यांच्या व्यावहारिक सल्ल्यामुळे आणि उदाहरणांमुळे विद्यार्थ्यांना भविष्यातील करिअरची ध्येये कशी निश्चित करावीत, हे समजण्यास मदत झाली. त्यांनी आपल्या चर्चासत्रमध्ये डेटा सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, बॅंकिंगमधील करियरच्या विविध संधींबद्दल महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.
बी.एस्सी. अंतिम वर्षाची विद्यार्थिनी सान्वी भोसले हिने प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन बी. सी. ए. अंतिम वर्षाच्या तेजस्विनी बाभळे व सानिका कदम यांनी केले तर हर्षद बंडीवार यांनी आभार मानले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधवराव कदम यांच्या मार्गदर्शनात प्लेसमेंट सेलचे समन्वयक प्रा. डॉ. पी. डी. शिरभाते व प्रा. ए. वाय. खान यांच्या सहकार्याने रितेश गाडेकर, साईनाथ निर्मलवाड, मयूर देवसरकर, समाधान भालेराव, गोपाल सावंत, कृष्णा महाजन, श्रुतिका पाटील या विद्यार्थ्यांनी कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!