जवरला येथील ‘खुले सामाजिक सभागृहाच्या’ बांधकामाचा भुमिपुजन सोहळा संपन्न.
जवरला येथील ‘खुले सामाजिक सभागृहाच्या’ बांधकामाचा भुमिपुजन सोहळा संपन्न…!
निवडणूकसमयी आ. केराम यांच्या आश्वासनाची पुर्तता
किनवट:- प्रतिनिधी
डोंगरी विकास निधीअंतर्गत किनवट तालुक्यातील मौजे जवरला येथील खुले सामाजिक सभागृहाच्या बांधकाम भुमिपुजनाचा सोहळा आज रोजी संपन्न झाला असून निवडणूकसमयी दिलेला शब्द आ. केराम यांनी तंतोतंत पाळला असल्याची भावना यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केली..
किनवट तालुक्यातील मौजे जवरला हे गाव महाराष्ट्राच्या महामहिम राज्यपाल महोदयांचे दत्तक गाव असून गावात सामाजिक सभागृह व्हावे अशी भावना विधानसभेच्या मागील निवडणुकांच्या वेळी ग्रामस्थांनी आमदार भिमरावजी केराम यांच्याकडे व्यक्त केली होती. त्या दिल्या शब्दाचे तंतोतंत पालन करत डोंगरी विकास निधीअंतर्गत आ. केराम यांच्या प्रयत्नातून १० लक्ष रूपये किमतीचे खुले सामाजिक सभागृह मंजूर करण्यात येवून या सामजिक सभागृहाच्या बांधकामाचा भुमिपुजन सोहळा आज दि. ८ जून रोजी ग्रामस्थांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला…
दरम्यान जवरला येथील शनिदेव संस्थान येथील परिसरात ‘खुले सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन आमदार केराम यांचे प्रतिनिधी तथा स्वीय सहाय्यक प्रकाश कुडमते यांच्यासह माधवरावजी मरस्कोल्हे पाटील तसेच बालयोगी मनू महाराज सायफळ यांच्या हस्ते पार पाडण्यात आला.. यावेळी गावातील सुनील पडलवार, रघुनाथ मरस्कोले, मलकु पेंदोर, उत्तम खामनकर, संतोष चांदेकर, संतोष गेडाम, बाबाराव कयापाक, विनोद लिंगमपल्लीवार, अमृत गेडाम, रोशन लढे, परशुराम मडावी, ओमप्रकाश मरस्कोले, पांडुरंग उर्वेते, सुदर्शन मरस्कोल, मनोज सोनुले, सोपान आत्राम, राहुल चांदेकर आदींसह अनेक नागरीकांची उपस्थिती होती…
Thanks for sharing. I read many of your blog posts, cool, your blog is very good. https://www.binance.com/bn/register?ref=VDVEQ78S