विदर्भातील सर्वात मोठा दहीहंडी उत्सव आयोजित करणारे – नितीन भुतडा २ लाख २२ हजार २२२ रुपयाचे बक्षीस.

youtube

विदर्भातील सर्वात मोठा दहीहंडी उत्सव

२ लाख २२ हजार २२२ रुपयाचे बक्षीस.

उमरखेड -. मागील दोन वर्षापासून स्व. प्रमोद महाजन चारीटेबल ट्रष्टच्या वतीने उमरखेड शहरात विदर्भातील सर्वात दहीहंडी महोत्सव सोहळा भारतीय जनता पार्टीच्या वतीने साजरा करण्यात येतो यावर्षीच्या दहीहंडी साठी २ लाख २२ हजार २२२ रुपयाचे बक्षीस ठेवण्यात आले आहे. या दहीहंडी सोहळ्यासाठी सैसाट फेम रिंकू राजगुरु शनिवार दिनांक १० सप्टेंबर रोजी उपस्थित राहणार आहे तर भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे , वनमंत्री सुधीर मुनगंठीवार , भाजपा महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ ,खासदार हेमंत पाटील , खासदार भावना गवळी , आमदार मदन येरावार , आ. संदीप धुर्वे , आ. अशोक उईके , आ. संजीव बोदकुरवार, आ.निलय नाईक , आ. नामदेव ससाने , गजानन घुगे, उत्तमराव इंगळे , भाजपा पुसद जिल्हा अध्यक्ष महादेव सुपारे , भाजपा यवतमाळ जिल्हा अध्यक्ष तारेंद्र बोर्डे हे उपस्थित राहणार असल्याचे भाजपा जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले यावेळी महेश काळेश्वरकर , सुदर्शन रावते , अजय बेदरकर , अतुल खंदारे, आनंदराव राणे , प्रमानंद कदम , राहुल अनखुळे उपस्थित होते. सदर दहीहंडीचा कार्यक्रम हा जिल्हा परिषद मुलांचे हायस्कूलच्या मैदानावर होणार असून पांच गोविंदा पथके यामध्ये सहभागी होणार असल्याची माहीती पत्रपरिषदेत नितीन भुतडा यांनी दिली आहे.

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!