उमरखेड मध्ये सकल मराठा समाजाचा एल्गार सकल मराठा समाजाने काढली सरकारची तिरडी प्रेतयात्रा

youtube

उमरखेड मध्ये सकल मराठा समाजाचा एल्गार

सकल मराठा समाजाने काढली सरकारची प्रतीकात्मक प्रेतयात्रा

उमरखेड :- मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर लाठीचार्ज करणाऱ्या शिंदे फडणवीस सरकारच्या निषेधार्थ सकल मराठा समाजाच्या वतीने आज दिनांक ९ सप्टेंबर शनिवार रोजी उमरखेड शहरात प्रतीकात्मक प्रेतयात्रा काढण्यात येवुन निषेध नोंदविला.

मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे यासाठी मराठा क्रांती मोर्चाचे मनोज जरांगे पाटील यांनी जालना जिल्ह्यातील अंतरावली सराटी यागावात उपोषण आंदोलन सुरू केले आहे. त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी समाजातील महिला, पुरुष, वयोवृद्ध नागरिकांनी पाठींबा दर्शविला.

मराठा आरक्षण मागणी संदर्भात सराटी येथे पोलिस प्रशासनाने लाठीचार्ज केला त्यामध्ये महिला, शाळकरी विद्यार्थी, नागरिक गंभीर जखमी झाले. त्याबद्दल समाजामध्ये तीव्र संताप उमटला असुन राज्यभर मराठा समाजाच्या भावनेचा उद्रेक होत आहे. त्याच अनुषंगाने उमरखेड तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने शिंदे फडणवीस पवार सरकारचा निषेध करीत प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढण्यात आली. ही प्रतीकात्मक प्रेतयात्रा छत्रपती शिवाजी महाराज चौका मधुन सुरू होवुन मार्गक्रमण करीत श्रीराम चौकात थांबविण्यात आली.व त्यानंतर ती तहसील कार्यालयच्या समोर जे चार दिवसापासून ५ युवकांचे आमरण उपोषण चालु आहे त्याच्या मंडपा समोर आणण्यात आली व शिंदे फडणवीस व अजित पवार सरकारच्या नावे घोषणा देण्यात आल्या व निषेध नोंदवीला दरम्यान याठिकाणी मार्लेगांव च्या युवकांनी अर्धनग्न आंदोलन करुन आपल्या मागण्यांचे निवेदन तहसीलदार आनंद देऊळगांवकर यांना दिले आजच्या आंदोलनात सहभाग आणि पाठींबा देण्यासाठी मार्लेगांव, चातारी, नागेशवाडी, वरुडबीबी या गावाचे ग्रामस्थ आले होते पाऊस चालु असतांना सुद्धा तालुक्यातील मराठा समाज बांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थिती पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ यांच्या नेतृत्वात पोलीस प्रशासन सर्व आंदोलना वर नजर ठेवुन परिस्थिती गांभीर्याने हाताळत आहे

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!