विविध सामाजिक उपक्रमांनी भाजयुमो शहराध्यक्ष अतुल खंदारे यांचा वाढदिवस साजरा.
विविध सामाजिक उपक्रमांनी भाजयुमो शहराध्यक्ष अतुल खंदारे यांचा वाढदिवस साजरा
उमरखेड : –
भाजयुमो शहराध्यक्ष अतुल खंदारे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दि. 16 ऑक्टोंबर रोजी भाजपा कार्यकर्यांनी एकत्र येऊन दिवसभर विविध सामाजिक उपक्रम राबवून विधान सभेतील युवा नेतृत्व म्हणून नावारूपास आलेल्या अतुल खंदारे यांचा वाढदिवस साजरा केला .
खंदारे यांच्या वाढदिवशी हनुमान मंदीरात अभिषेकाने सुरवात करून भाजपा कार्यकर्त्यांकडून दिवसभर सामाजिक कार्यक्रम राबविले . यामध्ये बर्थडे गार्डनवर जाऊन वृक्षारोपण करण्यात आले . अंबोना तलाव परिसरातील गौशालेत जाऊन जनावरांना सुग्रास चारा वाटप केला . जि.प मुले व मुलींच्या शाळेत जाऊन शालेय साहित्य वाटप करण्यात आले .गोरोबा विद्यालयातील वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना भोजन दिले . नगर परिषद सफाई कामगार भगिनींना साडी चोळीचे वाटप केले , उत्तरवार शासकिय रुग्णालयात जाऊन फळवाटप केले . स्थानिक माहेश्वरी चौकात झालेल्या कार्यक्रमात मोफत आरोग्य विषयक व विविध शासकिय योजनांची माहिती शिबीराच्या माध्यमातून देण्यात आली यामध्ये आयुष्यमान भारत जनआरोग्य योजना, महात्मा फुले आरोग्य योजना, भारतीय पोस्ट बँक खाते , प्रधानमंत्री जीवन बिमा योजना, प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना, ई श्रम सेवा कार्ड , नवीन मतदार कार्ड नोंदणी , सुकन्या समृद्धी योजना या विविध योजनांचा लाभ घेण्या बाबत असंख्य नागरिकांना मार्गदर्शन केले . यावेळी अनेक युवा कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश घेतला .अशा विविध सामाजिक कार्यक्रमांची दिवसभर रेलचेल होती . हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी यवतमाळ जिल्हा भाजयुमो सरचिटनिस लक्ष्मीकांत मैड ,जेष्ठ कार्यकर्ते किसनराव वानखेडे, शहर भाजपा सरचिटनिस पुंडलीक कुबडे, चंदु पाटील वानखेडे, भाजपा शहर उपाध्यक्ष प्रविण फुलारी, देवानंद इंगोले , युवा मोर्चा सरचिटनिस पवन मेंढे, संतोष लुटे, संतोष पवार, राहुल अनखुळे, सुमित मत्ते, डॉ. प्रतिक रुडे, शुभम काळे , देवा नरवाडे , दिपक चौधरकर, अक्षय फुलारी, निखील आलेवार, सागर घुगरे ,निखील इंगळे, सुशांत भराडे , प्रदिप शेरे, महाविर महाजन , यासह असंख्य कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले .