कर्तव्यदक्ष पोलिसांचा सन्मान : बिटरगाव पोलीस स्टेशनच्या पोलिसांना यवतमाळ येथे प्रशस्तीपत्र देऊन गौरव ढाणकी प्रतीनीधी:-

youtube

कर्तव्यदक्ष पोलिसांचा सन्मान : बिटरगाव पोलीस स्टेशनच्या पोलिसांना यवतमाळ येथे प्रशस्तीपत्र देऊन गौरव

ढाणकी प्रतीनीधी:-

उमरखेड तालुक्यातील बिटरगाव पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचारी आपल्या प्रामाणिक व तत्पर सेवेमुळे संपूर्ण जिल्ह्यात कौतुकास पात्र ठरले आहेत. पोलिस दलात कार्यरत असताना नागरिकांचा विश्वास संपादन करणे आणि गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणे ही अत्यंत आव्हानात्मक जबाबदारी असते. तरीही बिटरगाव पोलीस स्टेशनमधील पोलिसांनी आपल्या निष्ठा, परिश्रम व कर्तव्यदक्षतेमुळे ही जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली आहे.

नुकत्याच घडलेल्या गुन्ह्यात त्यांनी कलम 118(1) BNS अंतर्गत केवळ 24 तासांच्या आत न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करून दाखवलेली तत्परता आणि बुलढाणा अर्बन मधील बहुचर्चित प्रकरणाचा तपास करत तब्बल 540 ग्रॅम सोने, किंमत तब्बल 55 लाख रुपये हस्तगत करून गुन्ह्याचा यशस्वी छडा लावणे हे त्यांच्या कार्यकौशल्याचे उत्तम उदाहरण ठरले आहे. अल्पावधीत केलेल्या या चौकशीतून त्यांच्या दक्षतेचा आणि तपास कौशल्याचा प्रत्यय आला.

या उल्लेखनीय व अनुकरणीय कामगिरीबद्दल मा. पोलिस अधीक्षक साहेब, यवतमाळ यांच्या हस्ते बिटरगाव पोलीस स्टेशनमधील ठाणेदार पोलीस निरीक्षक पांडुरंग शिंदे ,पोलीस उपनिरीक्षक सागर अन्नमवार ,बीट जमदार रवी गीते, रोशन सरनाईक,
पो ना मोहन चाटे, पो शि प्रवीण जाधव, रावसाहेब मस्के या कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. विशेष म्हणजे या प्रशस्तीपत्र वितरण सोहळ्यात कुमार चित्ता यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

या सन्मानामुळे केवळ बिटरगाव पोलीस स्टेशनचाच नव्हे तर संपूर्ण उमरखेड तालुक्याचा मान उंचावला आहे. नागरिकांनीही या कार्याचे मनःपूर्वक कौतुक केले असून, “पोलीस दलाचे कार्य हे फक्त कायदा सुव्यवस्थेपुरते मर्यादित नसून, जनतेत विश्वास व सुरक्षिततेची भावना निर्माण करणे हे देखील महत्त्वाचे आहे. बिटरगाव पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी आपल्या कार्यातून ही भावना समाजात दृढ केली आहे,” असे मत व्यक्त करण्यात आले.

कर्तव्यनिष्ठा, प्रामाणिकपणा, तत्परता आणि धैर्य यांचे उत्तम उदाहरण म्हणून या पोलिसांचा सन्मान इतर पोलिसांसाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास नागरिक तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

उमरखेड तालुक्यातील बिटरगाव पोलीस स्टेशनच्या या उल्लेखनीय कामगिरीचा अभिमान प्रत्येक तालुकावासीयास वाटत असून, भविष्यात देखील असेच उत्तम कार्य घडावे, हीच सर्वांची अपेक्षा आहे.

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!