उमरखेड तालुकाध्यक्ष पदी विठ्ठल वानखेडे तर शहराध्यक्ष पदी अतुल खंदारे.

youtube

उमरखेड तालुकाध्यक्ष पदी विठ्ठल वानखेडे तर शहराध्यक्ष पदी अतुल खंदारे.

उमरखेड :- भारतीय जनता पार्टी च्या प्रदेश कार्यकारणीने ९६३ मंडल अध्यक्ष यांचे नावाची यादी तयार करून त्या त्या मंडलात पाठवली त्यानुसार दिनांक २० एप्रिल रोजी संध्याकाळी ६ वाजता स्थानिक राजस्थानी भवन हॉल मध्ये जिल्हा समन्व्यक नितीन भुतडा, आमदार किसन वानखेडे, निरीक्षक पुसद जिल्हा उपाध्यक्ष निखिल चिद्दरवार, अमेय नाईक यांनी उमरखेड तालुका अध्यक्ष पदी साखरा या गावचे विठ्ठल वानखेडे यांचे नाव जाहीर केले तर शहराध्यक्ष पदी अतुल खंदारे यांचे नाव जाहीर केले.
या वेळी , सहकार आघाडी अध्यक्ष बळवंतराव नाईक, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश चव्हाण, तालुकाध्यक्ष सुदर्शन रावते, किशोर वानखेडे,, जिल्हा उपाध्यक्ष अजय बेदरकर, शहराध्यक्ष प्रकाश दुधेवार, जिल्हा महामंत्री महेश काळेश्वरकर, दत्ता गंगासागर,सविता पाचकोरे, व पद अधिकारी व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते त्यानंतर स्थानिक माहेश्वरी चौकात फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली आणि दोन्ही नविन जाहीर करण्यात आलेल्या अध्यक्ष यांचा सत्कार करण्यात आला सर्व राज्यात जाहीर करण्यात आलेल्या मंडल अध्यक्ष यांना ३५ ते ४५ ची वयोमर्यादा ठेवण्यात आली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!