खाटेवरून रुग्णाला नेणाऱ्या जनुना गावकर्यांच्या व्यथेची भाजपा नेत्याकडुन दखल: एकाच दिवसात चक्क रस्त्याचे भुमीपुजन: लवकरच होणार कामाला सुरुवात प्रतिनिधी । उमरखेड:

खाटेवरून रुग्णाला नेणाऱ्या जनुना गावकर्यांच्या व्यथेची भाजपा नेत्याकडुन दखल:
एकाच दिवसात चक्क रस्त्याचे भुमीपुजन: लवकरच होणार कामाला सुरुवात
प्रतिनिधी । उमरखेड:
पाच दशकापासून गावाला रस्ताच नसलेल्या तालुक्यातील जनुना वरुडबिबी येथे चिखलाच्या रस्त्यामुळे गावात वाहन येत नाही . त्यामुळे एका वयोवृद्ध रुग्णाला उपचार करीता नेण्यासाठी एक ते दोन किलो मिटर खाटेवर उचलुन नेण्यात आल्याची घटना वृत्तपत्रातून प्रकाशित होताच भाजपा नेते नितिन भुतडा यांनी गावकर्यांच्या व्यथेची दखल घेत गावाला
एक कोटी 48 लाख दिंडाला ते जनुना रस्त्यासाठी खडीकरण रस्ता तसेच
वीस लाख रुपये गावातील सिमेंट रस्ते ,
वीस लाख रुपये शाळेतील दुरुस्ती फ्लेवर ब्लॉक वर्गखोल्या दुरुस्तीसाठी शासनाकडून मंजूर करून घेवून रस्त्याचे आज भुमीपुजन केले आहे .
वरुडबिबी अतर्गत जनुना हे आदिवासी समाजाचे छोटे गाव आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाली पण गावाला अजुन पर्यंत रस्ता नाही. पावसाळ्यात आहे तो रस्ता पुर्णतः चिखलमय झालेला आहे. अशा परिस्थितीत मागील दहा वर्षात रस्त्यातच अनेक गरोदर महिलाची प्रसूती झाली आहे. आजारी व्यक्ती व गरोदर महिलांना तातडीचे वैदयकिय मदत मिळणे अशक्य आहे. असेच एका वृद्ध व्यक्तीस बाजेवरून रुग्णालयात नेले आहे, तरी लोकप्रतीनिधी, अधिकारी यांनी लक्ष घालून पक्कया रस्त्याचे काम करून दयावे. अशी गावकरी मंडळीची मागणी केल्याचे व रुग्णाला खाटेवरून रुग्णालयात नेत असल्याचे वृत्तपत्रातून प्रसिद्ध करण्यात आले होते त्याची गांभीर्याने दखल घेत नितिन भुतडा यांनी आज भुमीपुजन करून रस्त्याच्या कामाला सुरुवात केली आहे . यावेळी माजी आमदार विजय खडसे, अमानपूर सरपंच बाबूलाल चव्हाण, चिली सरपंच बळीराम राठोड, बोथा सरपंच गणेश राठोड,सुकळी सरपंच शिवाजी रावते, दिंडाला सरपंच कैलास राठोड,वरूड बीबी सरपंच तुकाराम जाधव गजानन मोहळे , विक्की जोशी आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
कोट :
जनुना गावची समस्या अतिशय गंभीर आहे त्या वर कायम उपाय योजना करण्याचे दृष्टीने 148 लक्ष रु मंजूर करण्यात आले आहे.परंतु वन विभागाची NOC प्राप्त नसल्याने कामाला सुरवात करण्यात अडचण आहे त्या सर्व विषयात पाठपुरावा सुरू असून येत्या आठ दिवसात प्रत्यक्ष कामाला सुरवात होईल .
नितिन भुतडा
भाजपा जिल्हा समन्वयक .
सोबत फोटो :
Rattling nice layout and good content material, absolutely nothing else we require : D.