भाजपचे योगी शाम भारती महाराज यांचा अपक्ष म्हणून हिंगोली लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल. उमरखेड –

youtube

भाजपाचे योगी शाम भारती महाराज यांचा अपक्ष म्हणून हिंगोली लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल.

उमरखेड –
भाजपा मराठवाडा अध्यात्मिक आघाडीचे सहसंयोजक योगी शाम भारती महाराज यांनी हिंगोली लोकसभा मतदार संघातून अपक्ष म्हणून आपला नामांकन अर्ज आज दिनांक 3 एप्रिल रोजी दाखल केला असून योगी शाम भारती यांनी अपक्ष म्हणून दाखल केलेल्या उमेदवारीमुळे महायुतीची डोकेदुखी वाढणार आहे मागील पंधरा वर्षापासून भारतीय जनता पक्षात राहून काम करणाऱ्या योगी शाम बापू यांचा हिंगोली लोकसभा मतदार संघात दांडगा जनसंपर्क असून अध्यात्मिक क्षेत्राशी निगडित लोकांसह त्यांचा जनसामान्यात दांडगा जनसंपर्क आहे त्यांनी आज आदिवासी नृत्यसह ढोल ताशाच्या गजरात हिंगोली शहरातून रॅली काढली होती यावेळी नामांकन अर्ज दाखल करताना मोठ्या संख्येने योगी श्याम भारती यांचे हितचिंतक व कार्यकर्ते उपस्थित होते.

(चौकट)

आता माघार घेणार नाही! महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटाकडून भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना नेहमीच ही न दर्जाची वागणूक हिंगोली लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदाराकडून देण्यात आली असून अशा प्रकारच्या वागणुकीला कंटाळलेल्या कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव आपण हा उमेदवारी अर्ज दाखल करत असून आता आपण दाखल केलेल्या उमेदवारी अर्ज मागे घेणार नाही असे यावेळी श्याम भारती यांनी दैनिक जनमाध्यमशी हिंगोली येथे बोलताना सांगितले.

Google Ad
Google Ad

1 thought on “भाजपचे योगी शाम भारती महाराज यांचा अपक्ष म्हणून हिंगोली लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल. उमरखेड –

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!