शेतातल्या झोपडीत जन्मली अन् झोपडीत राहुनच शिकली तरी सुद्धा दहावित 93% टक्के घेतले.
शेतातल्या झोपडीत जन्मली अन् झोपडीत राहुनच शिकली तरी सुद्धा दहावित 93% टक्के घेतले.
दिड एकर शेती असलेल्या 24 तास दारुच्या आहारी
गेलेल्या पित्याच्या मुलीची कीमया शिकुन मोठं व्हायचय पण परिस्थिती आडवी येते.
हदगाव
म्हणतात ना कमळ नेहमी चिखलातुनच उगवतं.तसच काही नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्याच्या नकाशावर सुद्धा ज्या गावाची नोंद नसलेल्या व पाच सहा घरं असलेल्या बेचिराख गाव असलेल्या खामगव्हाण येथील शेतातच जन्माला आलेल्या व जातीने धनगर असलेल्या लक्ष्मन हुंबे या दिड एकर शेती असलेल्या व 24 तास दारुच्या आहारी गेलेल्या या शेतमजुर शेतकऱ्याच्या *”पृथ्वी”* ने गावा लगत असलेल्या चिंचगव्हाण येथील कै.कोंडाबाई व्यवहारे या शाळेत शिक्षण घेतले.आदर्श शिक्षक व होतकरु विद्यार्थी असला की शिकवनी विना सुद्धा चांगले गुण घेऊ शकतो हेच या मुलीने करुन दाखवले.
हल्ली क्लासेसचा जनु ट्रेंडच झालाय पण,कोनतीही शिकवनी नाही,आई वडील गरीब,मुलगी काय शिकतेय याचे भानही नसलेला दारुडा बाप असुनही तब्बल 93 टक्के गुण घेतलेल्या पृथ्वीने आपला ठसा उमटवला व शाळेतुन द्वितीय तर धनगर समाजातुन तालुक्यात पहीला येणाचा मान मिळवला.
पृथ्वीने मला शिकुन खुप मोठे व्हायचे पण घरची परिस्थिती आड येत असल्या आमच्या प्रतिनिधींशि बोलतांना डोळ्यात अश्रू आनत सांगितले .
जिल्हा व तालुक्यातील आमदार,खासदार ,दानसुर व्यक्तिनी पुढे येत अशा होतकरु विद्यार्थ्यांना अर्थीक पाठबळ दिलं तर चिखलात उमलेलं कमळ चिखलातच राहनार नाही.
माझ्या आईचा महाराष्ट्र ग्रामिण बँक शाखा हदगाव जिल्हा नांदेडचा 80050552445 हा खाते नंबर असुन IFSC कोड MAHG0004142 हा आहे,तरी कृपया या खात्यावर अर्थीक मदत पाठवावी तुम्ही केलेल्या मदतीमुळे मी यशाची शिखरे नक्कीच सर करेन अशी विनंती पृथ्वी ने केली आहे.
पृथ्वी तुला भावी आयुष्यासाठी हार्दीक शुभेच्छा .संघर्ष कर शिक व मोठी हो,हीच अपेक्षा .