उमरखेड तालुक्यातील मार्लेगांव येथील पैनगंगा नदीवर बसला अडवून पेट्रोल टाकून जाळून टाकली.
Breaking news
उमरखेड तालुक्यातील मार्लेगांव येथील पैनगंगा नदीवर बसला अडवून पेट्रोल टाकून जाळून टाकली
उमरखेड
तालुक्यातील मार्लेगांव काल रात्री साडेअकरा वाजता दरम्यान एसटी महामंडळाची बस नांदेड ते नागपूर जाणारी अज्ञात सात ते आठ व्यक्तीने तोंडावर बांधून बस अडवून लाठया खाट्या हातात घेऊन बस मधील प्रवाशांना खाली उतरून पेट्रोल टाकून जाळून टाकल्याची घटना उमरखेड येथील विदर्भ मराठवाडा जोडणाऱ्या पैनगंगा नदीवरील पुलावरही घटना घडली असून या बस मध्ये 73 प्रवासी होते याचा तपास उमरखेड पोलीस करत आहे . दोन दिवसापूर्वी मराठा आंदोलकांनी मराठा आरक्षण न मिळाल्यास नागपूर तुळजापूर महामार्ग बंद करु अशी मागणी केली होती. अज्ञात व्यक्तीवर उमरखेड पोलिसात 143, 147, 148, 427, 336 नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहे पुढील तपास ठाणेदार पांचाळ करत आहे