मुलांनी साजरा केला वडिलांचा 61वा वाढदिवस.
मुलांनी साजरा केला वडिलांचा 61वा वाढदिवस.
तालुक्यातील राजकीय नेत्यांची उपस्थिती.
ढाणकी प्रतिनिधी – सविता चंद्रे
आजचे युग हे संगणक युग म्हणून ओळखले जाते. या युगात भावनाशून्य असा माणूस वावरताना आपणाला दिसतो. ज्यांना माणसाला माणसाची ओळख राहिली नाही अशा या समाजात कृतज्ञ भावनेने आपल्या वडिलांचा 61वा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा केल्याने शहरात उदय पुंडे यांच्या नावाची चर्चा होत आहे.
ढाणकी येथील सेवानिवृत्त शिक्षक वर्धमान माधवराव पुंडे यांनी 12 जून रोजी 61 व्या वर्षात पदार्पण केले.
नेहमी मुलांचा वाढदिवस साजरे करणाऱ्या वडिलांचा आपणही वाढदिवस साजरा करावा या उदात्त हेतूने ढाणकी येथील लोकमत प्रतिनिधी उदय पुंडे, व सुरज पुंडे यांनी ठरवले आणि मोठ्या थाटामाटात वर्धमान माधवराव पुंडे यांचा दत्त मंदिर ढाणकी येथे वाढदिवस साजरा करण्यात आला.
वडीलांचा 61 वा वाढदिवस एवढा मोठा कार्यक्रम घेऊन साजरा करण्याची ही शहरातील पहिलीच वेळ होती. त्यामुळे हा वाढदिवस सर्वत्र कौतुकाचा विषय ठरत आहे.
यावेळी पुंडे सरांच्या चाहत्या वर्गाणी सरांचा शाल व श्रीफळ देऊन सरांचा सन्मान केला व उदय पुंडे यांचे कौतुक सुद्धा केले. हा सोहळा पाहून पुंडे यांच्या डोळ्याच्या कडा अलगद ओल्या झाल्या.
वडिलांच्या कौतुकाचा सोहळा पाहण्यासाठी तालुक्याचे विद्यमान आमदार नामदेवराव ससाने, ढाणकी चे नगराध्यक्ष सुरेशलाल जयस्वाल, उपनगराध्यक्ष शेख जहीर शेख मौला, माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर, माजी आमदार विजयराव खडसे, मोहनराव मोरे, जि प सदस्य चिंतान्गराव कदम,शैलेश गांजरे ,पुजा शलैश गांजरे (य ),सौ.उषा वर्धमान पुंडे (अंगणवाडी सेविका) अनिलअण्णा नरवाडे, शिवसेना तालुकाप्रमुख सतीश नाईक, नगरसेवक संदीप ठाकरे, जिल्हा उप संघटक राजूभाऊ खामणेकर, तातूभाऊ देशमुख, कृष्णा पाटील देवसरकर,प्रकाश दुधेवार, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती बाळासाहेब चंद्रे पाटील, ढाणकी शहर अध्यक्ष अमोल तुपेकर, ठाणेदार बोस.रुपेश भंडारी, सविता चंद्रे महिला पत्रकार . बंटी जाधव, संभाजी गोरटकर, विशाल नरवाडे, प्रशांत जोशी, गजानन सुरोशे, रमेश पराते, रामराव गायकवाड, माजी जि प सदस्य उत्तम राठोड, महेश पिंपरवार, बाळासाहेब गंधेवार, भास्करपाटील चंद्रे, बबलू जाधव, प्रफुल कोठारी, सुभाषबाबू कुचेरिया, आनंदराव चंद्रे, संतोष पुरी, सुभाष गायकवाड,बंडू अण्णा जिल्हावार, अतुल येरावार, बाबुराव नरवाडे, उत्तम रावते, प्रवीण जैन, तालुक्यातील राजकीय नेते मंडळी शहरातील प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार संघ, व्यापारी वर्ग, पोलीस कर्मचारी, नगरपंचायत कर्मचारी, महावितरण कर्मचारी, व दत्त मंदिर संस्थानाचे कृष्णा महाराज उपस्थित होते. सूत्रसंचालन कोंडलवार सर यांनी केले.स्नेहभोजना नंतर कार्यकर्माची सांगता करण्यात आली.
Can you be more specific about the content of your article? After reading it, I still have some doubts. Hope you can help me.
You have remarked very interesting points! ps nice web site.Raise range