चिल्ली सर्विस रोडचे काम त्वरित करा -गावकऱ्यांचे एसडीओंना निवेदन: आंदोलनाचा इशारा

चिल्ली सर्विस रोडचे काम त्वरित करा -गावकऱ्यांचे एसडीओंना निवेदन: आंदोलनाचा इशारा
नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्ग 361 या मार्गावरील चिल्ली या गावाला जोडणाऱ्या सर्विस रोड वरून महामार्ग निर्मितीच्या बांधकामासाठी धावणाऱ्या अवजड वाहनामुळे खच खळगे निर्माण होऊन पूर्णपणे खराब झाल्याने त्या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी अन्यथा तीव्र आंदोलन छडावे लागेल असा इशारा शिवसेना शिंदे पक्षाचे तालुका प्रमुख संतोष जाधव यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे देण्यात आले आहे.
चिल्ली या गावावरून जाणाऱ्या गावाच्या सर्विस रोड वरून नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्ग बांधकामासाठी माल वाहतुक करणाऱ्या अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात रेलचेल असल्यामुळे सर्विस रोडची पूर्णपणे खराब झाले असून वाहतुकीमुळे सर्विस रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहे
गावकऱ्यांना अतोनात त्रास सहन करावा लागत आहे गावकऱ्यांना तसेच शालेय मुलांना शाळेत जाण्यासाठी हा एकमेव रस्ता असल्याने खराब रस्त्यामुळे अनेक छोटे मोठे अपघात घडत आहेत यापुढे अपघात घडण्याची गावकऱ्यांना भीती निर्माण झाल्याने सदर सर्विस रोडचे काम त्वरित करावे यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे गावकऱ्यांनी वारंवार पाठपुरावा केला परंतु त्यांच्याकडून चालढकल होत असल्यामुळे सदर सर्विस रोडच्या दुरुस्तीचे काम रखडलेले आहे
संबंधित राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कार्यालयाला आदेश देऊन चिल्ली सर्विस रोडचे काम त्वरित करावे अन्यथा आंदोलन छेडावे लागेल असा इशारा शिवसेना (शिंदे) पक्षाचे तालुका प्रमुख संतोष जाधव यांच्या नेतृत्वात शिवसेना नेते रविकांत रूडे, उपसरपंच सुरेश राठोड ग्रा. पं . सदस्य ध्रुवराज जाधव,कृष्णा जाधव विनायक मरडकर , गणेश आडे, अरविंद राठोड, सुरेश राठोड, विजय राठोड आदीनी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे