पिंपळगाव वन येथील नागरिक बसले तहसील कार्यालयाच्या पटांगणात आमरण उपोषणाला

youtube

पिंपळगाव [वन] येथील, नागरिक बसले तहसील कार्यालयाच्या पटांगणात आमरण उपोषणाला

उमरखेड…..
[मौजे पिंपळगाव (वन ) येथील पालकमंत्री पांदन रस्ता योजनेअंतर्गत निकृष्ट दर्जाचे काम झाले असून सदर अडवणूक केलेला पांदन रस्ता खुला करून देणे बाबत गावकरी बसले आमरण उपोषणाला ….
उमरखेड तालुक्यातील मौजे पिंपळगाव ( वन ) जि. यवतमाळ येथील कायम रहिवाशी असलेले नागरीक यांनी जि.प. बांधकाम यवतमाळ यांना यापूर्वी वारंवार सूचना देऊन त्यांनी पांदन रस्त्याचे कामाची कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही.
तसेच कोणतीही चौकशी सुद्धा केली नाही. त्यामुळे गावकऱ्यांनी निश्चित केलेले दिनांक 25/10/2021 रोजी सोमवार तहसील कार्यालय उमरखेड यांचे पटांगणात आमरण उपोषणास बसत आहोत.असे पिंपळगाव येथील ग्रामस्थांनी आव्हान केले होते .व आज रोजी पिंपळगाव येथील नागरिकांनी तहसील कार्यालय समोर आमरण उपोषण करिता पेंडाल टाकून बसण्यात आले .
तसेच तहसीलदार साहेबांनी पिंपळगाव येथील गावकऱ्यांच्या वरील बाबीचा सहानुभूती पूर्वक विचार करून वरील सर्व मागण्या पूर्ण करण्यात याव्या, अशी मागणी उपसरपंच व शेतकरी मंडळी मौजे पिंपळगाव(वन) येथील ग्रामस्थांनी केली. यावेळी गणेश रामायण माटाळकर(उपसरपंच), मोहन रामु राठोड सदस्य, दत्तात्रय यशवंत भांगे सदस्य, प्रकाश माटाळकर, गंभीर सवा राठोड, नामदेव मरूबा भांगे, शंकर भोजू राठोड, सुरेश हिरामण राठोड, शिवाजी संभाजी गायके,श्याम गणपत जाधव,साहेबराव ना. शिंदे, उपस्तित होते.

Google Ad
Google Ad

2 thoughts on “पिंपळगाव वन येथील नागरिक बसले तहसील कार्यालयाच्या पटांगणात आमरण उपोषणाला

  1. Your article gave me a lot of inspiration, I hope you can explain your point of view in more detail, because I have some doubts, thank you.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!