प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ विदर्भ वतीने कोविड योध्दा चा सन्मान विदर्भ अध्यक्ष सविता चंद्रे यांच्या पुढाकाराने
*प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, विदर्भ विभागाच्या वतीने कोविड योद्धांचा सन्मान*
*विदर्भ महिलाध्यक्षा पत्रकार सविता चंद्रे यांच्या पुढाकाराने प्रेरणादायी उपक्रम*
यवतमाळ : प्रेस संपादक पत्रकार सेवा संघ, महाराष्ट्र राज्य विदर्भ विभागाच्या वतीने दि.13/10/2020 रोजी यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या विदर्भ महिलाध्यक्षा पत्रकार सविता चंद्रे यांच्या पुढाकाराने संस्थापक अध्यक्ष डी.टी आंबेगावे यांच्या मार्गदर्शनाखाली कोविड योद्धांचा प्रेरणादायी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कोवीड १९ आपत्तीमध्ये पोलिस प्रशासन, आरोग्य प्रशासन, पत्रकार संघटना सामाजिक संस्था, दानशूर व्यक्ती सह विविध स्तरांवर केलेल्या सामाजिक बांधिलकीचा सन्मान व्हावा यासाठी कोरोना नियमांचे पालन करीत आयोजित केलेल्या कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून उमरखेड पोलिस स्टेशनचे निरीक्षक मोतीराम बोडखे यांच्या उपस्थितीत, प्रमुख अतिथी सहाय्यक पोलिस निरीक्षक पांचाळ , खेडकर, गाडे, ज्येष्ठ पत्रकार राजाभाऊ गांजेगावकर, सामाजिक कार्यकर्त्या देशमुख, पोलिस कर्मचारी सुलोचना राठोड यांच्या हस्ते सर्व मान्यवरांना सन्मान पत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
यामध्ये पोलिस निरीक्षक मोतीराम बोडखे, उप निरीक्षक खेडेकर, उप पोलिस निरीक्षक गाडे, psi पांचाळ, psi लता पगलवाड, व सर्व पोलिस कर्मचारी,
दैनिक वृत्तपत्र वार्ताहर संघ, विभागिय पत्रकार संघ ,दर्पन पत्रकार संघ. ज्येष्ठ पत्रकार राजाभाऊ गांजेगावकर तलाठी दुरकेवार,सुलोचना राठोड, पि.के.जाधव माहिती अधिकारी. सामाजिक कार्यकर्त्या सरोज देशमुख, उद्देश सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष दिपक ठाकरे,किरण मुकावार, संदिप शिदे,बडु जाधव चालक,सामाजिक कार्यकर्ते पत्रकार प्रभाकर दहीभाते,अखिल भारतीय पत्रकार संघ एवम पत्रकार संघ हदगाव यांचा सन्मान पत्र देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी पोलीस स्टेशनचे कर्मचारी, व्यंकटेश पेन्शनवार, नंदनवार, अझहर उल्ला खान ,अशोक गांजेगावकर पत्रकार व दानशुर उपस्थित होते. सुत्रसंचलन पोलिस बीट जमादार संतोष चव्हाण यांनी केले तर आभार पत्रकार तथा आयोजक सविता चंद्रे यांनी केले.