गांधी चौकात काँग्रेसचे धरने आंदोलन

youtube

गांधी चौकात काँग्रेसचे धरणे आंदोलन

उपविभागीय कार्यालयावर धडक मोर्चा

उमरखेड : – शेतकरी व कामगार बांधवांच्या विविध मागण्यांसंदर्भात उमरखेड तालुका व शहर काँग्रेस पक्षाच्या वतीने स्थानिक गांधी चौकात धरणे आंदोलन करण्यात आले त्यानंतर मोर्चा काढून उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले . तसेच पंतप्रधानांना निवेदन पाठवुन राहूल गांधी यांचे वर पोलीसांच्या कार्यवाही चा निषेध करण्यात आला .
केंद्र शासनाने लागू केलेले कृषी विषयक धोरण तत्काळ रद्द करावे ,अतिवृष्टीने तसेच पैनगंगेला आलेल्या पुरामुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई म्हणून ५० हजार रुपये मदत देण्यात यावी, नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजाराची तात्काळ कर्जमाफी देण्यात यावी , यासह इतर मागण्या संदर्भात तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने धरणे आंदोलन करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत निवेदन देण्यात आले.
गांधी चौकातील धरणे आंदोलनात कॉंग्रेसच्या नेतेमंडळींनी उपस्थितांना मार्गदर्शन केले यावेळी माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर ,जिल्हा उपाध्यक्ष तातु देशमुख ,जिल्हा परिषद बांधकाम सभापती रामभाऊ देवसरकर, माजी आमदार विजयराव खडसे ,तालुका अध्यक्ष दत्तराव शिंदे , माजी जि. प. अध्यक्ष रमेश चव्हाण, शहराध्यक्ष नंदकिशोर अग्रवाल ,पं. स. सभापती प्रज्ञानंद खडसे ,खाजाभाई कुरेशी ,गजानन कदम, प्रेम हनवते ,शेख तालीब यांनी मार्गदर्शन केले. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बाळू पाटील चंद्रे , गोपाल अग्रवाल ,बालाजी उदावंत, सोनु खतीब , राधेश्याम भट्टड , कीरणताई जोशी , मिलींद धुळे ,अॅड शिवाजी वानखेडे , जितेद्र पवार , गजानन रासकर , विरेंद्र खंदारे , ब्रिजलाल मुडे , बाळासाहेब चौधरी यांच्यासह शहर व तालुक्यातील कॉग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थीत होते.

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!