संभाषण हे समाजातून समाजाच्या ऐक्यासाठी जन्माला आले- डॉ .अनिल काळबांडे.

youtube

संभाषण हे समाजातून समाजाच्या ऐक्यासाठी जन्माला आले- डॉ .अनिल काळबांडे
उमरखेड :
भाऊसाहेब भोरे शिवशक्ती महाविद्यालयात , बाभुळगाव येथेपदवी व पदव्युत्तर मराठी विभागाच्या वतीने संभाषण कौशल्य या विषयावर विशेष मार्गदर्शन दि .२७ सप्टे.२०२२ रोजी महाविद्यालयात आयोजित करण्यात आले .
संभाषण हे समाजातून जन्माला येते आणि समाजाचे ऐक्य घडून आणते .संभाषण हे कोणत्याही कार्याचे मूळ आहे . आपल्या मनातील विचार,भावना याचा आविष्कार करण्याची क्षमता म्हणजे संभाषण होय .संभाषणाच्या प्रक्रियेत बोलणारा जितका महत्त्वाचा आहे तितकाच ऐकणाराही महत्त्वाचा आहे .बोलणार्‍याच्या चिंध्याही खपतात आणि न बोलणार्‍याचे सोनंही खपत नाही .आजचा जमाना खपवण्याचा आहे .यासाठी आपल्याकडे बोलण्याचे कौशल्य असणे आवश्यक आहे .ते प्रयत्नपूर्वक संपादन करता येते . अनौपचारिक संभाषण हे घरातील आई- वडिल, नातलग यांच्याशी केलेले संभाषण होय आणि औपचारिक संभाषण हे शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ अशा विविध ठिकाणी केल्या जाणारे संभाषण होय .या संभाषणात विद्यार्थी मागे राहतात . त्यांच्यात धाडस नसते .मांडणीचा,शब्दसंग्रहाचा, भाषेचा व अभ्यासाचा अभाव असतो यासाठी विद्यार्थ्यांनी सूत्रसंचालन ,भाषण, वक्तृत्त्व,वादविवाद अशा विविध संभाषण कौशल्य हस्तगत करणे काळाची गरज आहे .संभाषण हे तुमच्या जगण्याचे अर्थार्जन करून देणारे साधन आहे .असे आंबेडकरी साहित्य व चळवळीचे अभ्यासक, कवी,लेखक ,जगातील सात देशाचे बुद्धाच्या नेत्राने अवलोकन करणारे,विविध विद्यापीठात ज्यांच्या कविता अभ्यासाला आहेत .ज्यांची विविध विषयावरील आठ पुस्तके प्रकाशित आहेत .विविध पुरस्काराने गौरविण्यात आलेले आहेत ते हुंकारकार प्रो डॉ .अनिल काळबांडे यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रतिपादन केले .याप्रसंगी मराठी विभागाच्या वतीने डॉ . अनिल काळबांडे यांचा ग्रंथ भेट व शाल देऊन सत्कार करण्यात आला .
या कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ प्रतिभा काळमेघ हया होत्या .त्यांनी संभाषण कौशल्याचे महत्त्व विशद केले .त्यांचे वेगळं जग हा ग्रंथ भेट देऊन स्वागत करण्यात आले .या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ .युवराज मानकर यांनी केले . त्यांनी या संभाषण कौशल्याची आजची गरज कोणती आहे .संभाषणाशिवाय जीवन आणि संभाषणासह जीवन यातील अंतर सांगून प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला .या कार्यक्रमानंतर प्राचार्य आणि प्रमुख पाहुणे यांनी या विभागातर्फे चालविण्यात येणाऱ्या युवारंग या भित्तीपत्रकाचे अवलोकन केले .
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु .अनुश्री घोडे यांनी केले तर आभार कु .मोनिका घोडे हीने मानले .या कार्यक्रमासाठी मराठी भाषा व साहित्य अभ्यास मंडळाचे विद्यार्थी चंद्रशेखर बावणे, सम्यक काळपांडे इत्यादी विद्यार्थ्यांनी सहकार्य केले .या कार्यक्रमाला पंच्याहत्तर विद्यार्थी उपस्थित होते .

Google Ad
Google Ad

1 thought on “संभाषण हे समाजातून समाजाच्या ऐक्यासाठी जन्माला आले- डॉ .अनिल काळबांडे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!