अवैद्यरीत्या गोवंश तस्करी वाहतुक करण्याऱ्यावर पोफाळी पोलिसांची कार्यवाही.

youtube

अवैद्यरीत्या गोवंश तस्करी वाहतुक करण्याऱ्यावर पोफाळी पोलिसांची कार्यवाही

मुळावा प्रतिनिधी-:

पुसद- उमरखेड रोड वर अवैद्य गोवंश तस्करी वाहतूक करणाऱ्या इसमांवर पोफाळी पोलीस स्टेशनचे ठाणेदार पंकज दाभाडे यांनी कार्यवाही केली,
दि,08/03/रोजी पो, स्टे, पोफाळी हद्दीत 5.30 वा. दरम्यान पेट्रोलिंग करीत असताना पोफाळी पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहिती वरून पुसद ते उमरखेड रोडवर गंगणमाळ फाटा जवळ अवैद्य गोवंश वाहतूक करणाऱ्या दोन टाटा एस पिकअप वाहनावर रेड कार्यवाही करण्यात आली,यातील वाहनाचे चालकाने त्याचे वाहनात कोणत्याही चारा पाण्याची व्यवस्था न करता जाणवरांना निर्दयतेने डांबून दोरीने तोंडाला बांधून कत्तलीकरीता वाहतूक करीत असल्याचे दिसून आले,
त्यांच्या ताब्यात असलेले 11 गोवंश जातीचे जनावरे ज्यांची अंदाजे किंमत 1,12,000/- व 2 टाटा एस पिकअप वाहने प्रत्येकी किंमत 2 लाख प्रमाणे 4,00000/- व आरोपी कडील 2 जुने वापरते मोबाईल किंमत 11,000 रु असा एकूण 5,23,000/- रू चा मुदेमाल जप्त करून ताब्यात घेतले सदर 11 गोवंश जनावरे यांना राजस्थानी सेवा समिती गोशाळा उमरखेड येथे दाखल करण्यात आले आहे,
यामधील आरोपी विनोद खंडू कवडे, वय 50 वर्ष, रा. आंबेडकर वार्ड नवीन पुसद तालुका पुसद ( चालक)
संजय धर्मा राठोड वय 33 वर्ष रा.हेगडी ता. पुसद, (चालक)
शेख जुबेर शेख समद वय 35 वर्ष शेख सद्दाम शेख समद 30 वर्ष दोन्ही राहणार उमरखेड यांना पुढील चौकशी साठी ताब्यात घेण्यात आले,
सदरची कार्यवाही मा.पोलीस अधीक्षक श्री. पवन बनसोड सो, अपर पोलीस अधीक्षक श्री. पियुष जगताप सो, उपविभागीय पोलिस अधिकारी श्री. हनुमंत गायकवाड सो, स्था.गु.शा.चे पो.नि. श्री.आधारसिंग सोनवणे सो यांच्या मार्गदर्शनाखाली
पो स्टे पोफाळीचे ठाणेदार
पंकज दाभाडे
पो.ना.शिवाजी पवार
पो.शि. माणिक आदेवाड
चालक स.फौ. फिरोज काझी
यांनी केली आहे.सदर घटनेचा पुढील तपास पोफाळी पोलीस स्टेशनचे ठाणेदार पंकज दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे,

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!