भाच्याने घातला मामाकडे दरोडा.
भाच्याने घातला मामाकडे दरोडा
उमरखेड येथे कैलास शिंदे नातेवाईकांकडे लग्नाकरिता माहूरला गेले असता घरी दरोडा पडला. दरोड्यामागे मास्टरमाईंड तक्रारदाराचा भाचाच निघाला असून, त्याला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांनी पत्रपरिषदेत दिली.
डॉ. बन्सोड यांनी सांगितले, कैलास शिंदे हे लग्न आटोपून उमरखेडच्या हरिओम संकुल जवाहर वॉर्ड येथील घरी परत आले. तेव्हा त्यांना मुलीच्या लग्नासाठी तयार केलेले सोन्याचे दागिने, जुने दागिने असे एकूण ४८५ ग्रॅम सोने, चांदीचे दागिने २ किलो व रोख १ लाख रुपये असा एकूण ९ लाख ३७
हजार २०० रुपयांचा कपाटात असलेला मुद्देमाल चोरी गेला असल्याचे लक्षात आले.
त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्या अनुषंगाने उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाडवी व ठाणेदार अमोल माळवे, तपास अधिकारी प्रशांत देशमुख यांनी
ताब्यात घेतलेला आरोपी व मुद्देमालासह पोलिस पथक
गोपनीय माहिती तसेच तांत्रिक बाबींचा आधार घेऊन घटनास्थळाचा अभ्यास केला.
नवख्या चोराने आणि शिंदे यांचे घर व घरातील वस्तूंची माहिती असणाऱ्या व्यक्तीनेच चोरी केली असल्याचा निष्कर्ष काढला.
शिंदे यांचे नातेवाईक व इतर केली.
संबधितांकडे तपास केला. शिं यांचाच अभियंता असलेला सख्ख भाचा अक्षय ढोले याला ताब्या घेऊन चौकशी केली असता त्यान वेशांतर करून चोरी केल्याच कबुली दिली. आरोपीकडून ९० टक्के मुद्देमाल व नगदी १९ हजा रुपये जप्त केले असून, उर्वरि मुद्देमाल व रक्कम हस्तग करण्याचा प्रयत्न सुरू आहे. कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. पव बन्सोड, अपर पोलिस अधीक्षक पीयूष जगताप, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाडवी यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार अमोल माळवे सपोनि प्रशांत देशमुख, कैलार नेवकर, संदीप ठाकूर, निती खवडे, अतुल तागडे