ओलादुष्काळ जाहीर करण्यासहीत हेक्टरी 50 हजारांची सरसकट मदत द्या (काँग्रेसची राज्याचे विरोधीपक्षनेते मा अजितदादा पवारांना उमरखेड दौर्यादरम्यान मागणी).
ओलादुष्काळ जाहीर करण्यासहीत हेक्टरी 50 हजारांची सरसकट मदत द्या
(काँग्रेसची राज्याचे विरोधीपक्षनेते मा अजितदादा पवारांना उमरखेड दौर्यादरम्यान मागणी)
उमरखेड :
महाराष्ट्र राज्याचे विरोधीपक्ष नेते तथा माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दौरा कार्यक्रम नुसार नांदेड कडे जातांना येथील स्थानीक राजस्थानी भवन येथे थांबून काँग्रेसच्या वतीने ओलादुष्काळ जाहीर करण्यासहीत शेतकऱ्यांना सरसकट सर्वे करून 50 हजारांची मदत व विविध मागण्यासह निवेदन देण्यात आले.
उमरखेड महागाव तालुक्यातील सर्व महसूल मंडळ मध्ये दिनांक 13 व 14 जुलै रोजी तसेच त्यानंतर सुद्धा सरासरीपेक्षा दुप्पट पाऊस झाल्याने शेतकरी पूर्वतः उध्वस्त झाला असून त्याला परत उभारी देण्याकरिता ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांच्या पिकांचे रसकट सर्वे करून हेक्टरी 50 हजार रुपयाची मदत देण्याची मागणी यावेळी करण्यात आली तसेच अतिवृष्टीमुळे संपूर्ण तालुक्यातील रस्त्याचे संपूर्णतः नुकसान झाले असून अनेक पुलाची उंची कमी असल्याने आणि गवाचा संपर्क तुटल्याने पूलांची उंची वाढविणे, तालुक्यातील पेरनी उशिरा झाल्यामुळे पिके लहान अवस्थेतच खरडून गेल्याने शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करणे, शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचे इलेक्ट्रिक बिल माफ करणे या सर्व या प्रकारच्या मागण्या काँग्रेसच्या वतीने विरोधी पक्ष नेते यांच्याकडे मांडण्यात आल्या यावेळी राज्याच्या विरोधीपक्षनेत्यांसोबत माजी मंत्री धनंजय मुडे ही उपस्थित होते, निवेदन देतांना काँग्रेसचे मा आ विजयराव खडसे,तातू देशमुख,दत्तराव शिंदे, नंदकिशोर अग्रवाल,रमेश चव्हाण,बाळू चंदरे,डॉ कदम, खाज्याभाई, बाळू अण्णा, विवेक मुडे,सिद्धू जगताप, वीरेंद्र खंदारे,गजानन देशमुख, अमोल तुपेकर,किशोर ठाकूर, रुपेश भंडारी, गजानन भारती, तसेच राष्ट्रवादीचे बाळासाहेब कामारकर, शंकर तालंगकर,राजू जयस्वाल, कदम सर,अशा देवसरकर, शिवसेनेचे संदीप ठाकरे, सतीश नाईक, अमोल नरवाडे, सहित अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते
Thank you for your sharing. I am worried that I lack creative ideas. It is your article that makes me full of hope. Thank you. But, I have a question, can you help me?