ओबीसी डेटा एन्ट्रीमध्ये भोपे जातीची नोंद घेण्याची मागणी.
ओबीसी डेटा एन्ट्रीमध्ये भोपे जातीची नोंद घेण्याची मागणी
माहूर ता. (प्रतिनिधी )एन. तोडसाम
जात प्रवर्ग निहाय डेटा एन्ट्री मध्ये आपल्या जातीचे नोंद मानभाव ऐवजी भोपे अशी ध्यावी अशा आशयाची मागणी पं.स.चे माझी सभापती तथा जेष्ठ पत्रकार वसंतराव के. कपाटे यांनी तहसीलदार किशोर यादव यांनी दिलेल्या निवेदनात माहूर शहरात महानुभाव पंथीय व भोपे या जातीचे नागरीक पिढ्यानपिढ्या वास्तव्यास आहेत.पूर्वी हा भाग निजाम राजवटीत होता, तत्कालीन कर्मचारी व अधिकाऱ्यांनी सातबारा उताऱ्यावर आपल्या जातीची नोंद मानभाव अशी घेतली आहे. प्रत्यक्षात महानुभाव हा पंथ आहे. जात नव्हे सदर नोंदीमुळे मात्र भोपो समाजाला मिळणाऱ्या लाभापासून आपला समाज वंचित राहिल्याचा उल्लेखही केला आहे. शासनाच्या यत्रंने मार्फत सद्यस्थितीत आडनाव व महसुली पुरावे गृहीत धरून इंपिरिकल डाटा गोळा करण्यासाठीचे काम सुरु आहे, त्यात आपल्या जातीची नोंद भोपे ऐवजी मानभाव अशीच घेतली जाण्याची अधिक शक्यता असल्याची भितीही त्यांनी आपल्या निवेदनातून व्यक्त केले .