शरद पवार यांच्या घरावर हल्ला करणार्या समाजकंटकांवर कारवाई करा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी उमरखेड च्या निवेदनातून मागणी.
शरद पवार यांच्या घरावर हल्ला करणा-या समाजकंटकावर कार्यवाही करा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उमरखेड च्या वतीने मागणी.
उमरखेड….
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरदचंद्रजी पवार यांच्या घरावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ हल्ला करणा-या समाजकंटकांवर कडक कारवाई करण्यात यावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस तालुका शाखा उमरखेडच्या वतीने उपविभागीय अधिका-यांना निवेदन देवून मागणी करण्यात आली आहे.
उपविभागीय अधिकारी उमरखेड जि.यवतमाळ यांना आज दि. ९ रोजी लेखी निवेदन देवून ही मागणी केली आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा खा. शरदचंद्रजी पवार यांच्या घरावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्रातील राजकीय वातावरण जाणीवपूर्वक अस्थिर करण्याचा प्रयत्न काही उन्मत्त समाजकंटक करत आहेत.
तथापि शरदचंद्रजी पवार हे देशाचे नेते आणि सर्वार्थाने मार्गदर्शक असून राजकीय मतभेद आणि धोरणातील मतभिन्नता वेगळता ज्या पद्धतीने या घटनेला आंदोलनाचा मुलामा
देऊन वातावरण कुलुषित करण्याच्या या प्रयत्नांचा निवेदनातून जाहीर निषेध करण्यात आला.
मा.न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर तो मान्य करणे आवश्यक असताना घरावर दगडफेक करण्याचे कारण काय..? हा प्रश्नही निवेदनकर्त्यांनी उपस्थित केला. पोलीस प्रशासनाने या घटनेची पाळेमुळे खणून काढणे गरजेचे असून दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी संबंध राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उमरखेड जि.यवतमाळ च्या वतीनेभास्करराव पंडागळे
राजुभैय्या जयस्वाल.दत्ता गंगासागर,भिमराव पाटील चंद्रवांशी,बालाजी वानखेडे
युसुफभाई सौदागर,बळी तात्या चव्हाण,संभाराव कदम,स्वप्नील कन वाले,बबलू जाधव पाटील
अविनाश असोले,गुणवंत सूर्यवंशी,मिथीलेश जयस्वाल
अविनाश वानखेडे,आकाश माने
अजिंक्य देशमुख,ॲड दिनेश हणवते,झाकीर राज,निलेश घाडगे,रोहित हेलगंड,अमोल सूर्यवंशी,अविनाश यादवकुळे
करण्यात आली आहे..