स्वाभिमानी शेतकरी संघनेचा धडक मोर्चा.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा धडक मोर्चा
[ उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत निवेदन ]
उमरखेड – [प्रतिनिधी]
दि.9_ऑक्टोबर
चालू खरीप हंगाम 2021 – 22 मध्ये ओला दुष्काळ व अतिवृष्टीने संपूर्ण राज्यासह जिल्ह्यात पावसाने हाहाकार उडाला या अतिवृष्टीत शेतकरी आर्थिक दृष्ट्या उध्वस्त झालेला आहे. शेतमाल ‘ शेतकऱ्यांचं कधीही भरून न निघणारे नुकसान झाले आहे .उमरखेड,महागाव तालुक्यातील सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला असून सर्व रेकॉर्ड तोडले गेले आहेत .यामध्ये शेतकऱ्यांचे पशु जनावरे, मानव हानी मोठ्या प्रमाणात झालेली आहे .
राज्य शासनाने संबंधित अतिवृष्टी साठी जाहीर केलेली आर्थिक मदत अत्यंत अल्प व तोकडी असून तुटपुंजी आहे.त्यामुळे राज्य शासनाने वाढीव मदत द्यावी व बाधित शेतकऱ्यांना त्वरित मदत देण्यात यावी यासाठी आज बुधवार दिनांक 10 नोव्हेंबर रोजी उमरखेड येथे उपविभागीय कार्यालयावर स्वाभिमानी शेतकरी संघटना वतीने प्रणित स्वाभिमानी पक्षाचे उमरखेड तालुका अध्यक्ष अनिल माने यांनी माहिती दिली .या मोर्चामध्ये प्रमुख मागण्या यवतमाळ जिल्हा सह उमरखेड,महागाव तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून जाहीर झालेली दुष्काळी आर्थिक मदतीसाठी पात्र करण्यात यावे व ही मदत सरसकट देण्यात यावी .
चालू खरीप हंगाम 2021- 22 व झालेल्या ढग फुटी सारख्या पाऊस अतिवृष्टी ओल्या दुष्काळामध्ये नदी नाल्या ओड्या काठच्या ज्या विहिरी खचल्या गेल्या पडझड झाली अशा विहिरीना दुरुस्ती व तात्काळ शासकीय योजनेच्या माध्यमातून नवीन विहीर या शेतकऱ्यांना देण्यात यावी तसेच शेतकऱ्यांना 90 टक्के अनुदान तत्वावर हरभरा व गहू बी बियाणे खते उपलब्ध करून देण्यात यावी .
ओला दुष्काळ अतिवृष्टी मध्ये आर्थिक दृष्ट्या होरपळून निघालेल्या हतबल व हतास असलेल्या शेतकऱ्यांना महा विज वितरण कंपनीकडून शेतातील वीज तोडणीचे काम युद्ध पातळीवरुन संबंधित विभागाच्या माध्यमातून चालू असून ही वीज तोडणी थांबवण्यात यावी . या अशा सर्व विधायक शेतकऱ्यांच्या हितार्थ असलेल्या संवेदनशील व तत्पर त्याच्या मागण्या घेऊन यलगार मोर्चाच्या माध्यमातून शासनाला जाब विचारून उत्तर देण्यासाठी भाग पाडायचे आहे त्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने उमरखेड येथे उपविभागीय अधिकारी कार्यालय यांना निवेदन सादर करण्यात आले .
तसेच सरसकट मदत पंतप्रधान पिक विमा सह देण्यात यावी अन्यथा येणाऱ्या समोरच्या कालखंडात लोकशाही या विधायक व रचनात्मक मार्गाने तीव्र आंदोलन शेतकर्यांच्या वतीने करण्यात येईल असे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले .
267 thoughts on “स्वाभिमानी शेतकरी संघनेचा धडक मोर्चा.”