त्या’ घटनेच्या निषेधार्थ ढाणकी शहर कडकडीत बंद ढाणकी

‘त्या’ घटनेच्या निषेधार्थ ढाणकी शहर कडकडीत बंद
ढाणकी
माणुसकीला काळीमा फासणारी घटना ढाणकी शहरात घडली. ट्युशन घेणाऱ्या शिक्षकानेच आपल्या विद्यार्थिनीवर अतिप्रसंग केला. गर्भवती झाल्यानंतर त्यात तिचा मृत्यू झाला. या या घटनेमुळे समाजमन सुन्न झाले. ढाणकीकरांनी घटनेच्या निषेधार्थ शहर कडकडीत बंद ठेवण्याचे आवाहन केले. या आव्हानास सर्व व्यापारी बंधूनी स्वयंस्फूर्तीने प्रतिसाद देत, आपापली प्रतिष्ठाने सकाळपासून ते रात्रीपर्यंत कडकडीत बंद ठेवली.
ढाणकीकरांचा आक्रोश छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे झालेल्या सभेत यावेळी पाहायला मिळाला. सर्वपक्षीय नेतेमंडळी, सर्व जाती धर्माचे लोक गाव म्हणून यावेळी एकत्र आले होते. सर्वजण सदर घटनेच्या निषेधार्थ हळहळ तर व्यक्त करीत होती परंतु तितकाच राग सुद्धा व्यक्त करत होती.
आरोपीस फास्टट्रॅक न्यायालयात खटला चालवून तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी, यावेळी मोठ्या प्रमाणात नागरिक मागणी करत होते.
बिटरगाव पोलीस स्टेशनचा तगडा बंदोबस्त तैनात होता.
I have been absent for a while, but now I remember why I used to love this blog. Thank you, I will try and check back more often. How frequently you update your web site?