लाल मातीच्या गणेश मूर्ती चे वितरण उमरखेड.

youtube

लाल मातीच्या गणेश मुर्ती चे वितरण उमरखेड.

नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेतर्फे वृक्षरूपी पर्यावरण पूरक गणेश उत्सव

उमरखेेेड.
येथील नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेतर्फे दरवर्षीप्रमाणे पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी लाल मातीच्या मूर्तीचे वितरण करण्यात आले. हा उपक्रम पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने अत्यंत स्तुत्य असल्याचे मत ठाणेदार अमोल माळवे यांनी व्यक्त केले. तसेच उमरखेड येथील भूमिपुत्र आयबीएन लोकमत पुणे येथील पत्रकार गोविंद वाकडे यांनी सुद्धा या उपक्रमाचे कौतुक केले. लाल मातीच्या गणेश मुर्ती गणेश भक्तांना “ना नफा ना तोटा” या तत्त्वावर वितरण करण्यात आल्या.
प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मुर्त्या ऐवजी मातीच्या मुर्त्या स्थापन करण्याची जनजागृती व्हावी तसेच पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने प्रत्येक गणेश भक्ताने या गणेशोत्सवात एक झाड लावावे या उद्देशाने गणेश मूर्ती सोबतच पारिजातक वृक्ष तसेच कुंडी देण्यात आली. संस्थेचे अमरावती विभागीय अध्यक्ष प्रभाकर दिघेवार यांनी उपक्रमाची भूमिका विषद केली. आपण स्थापन केलेल्या गणेशमूर्तीचे घरीच विसर्जन करून त्या मातीमध्ये ह्या पारीजातक वृक्षाचे रोपण करून त्याचे यशस्वीपणे संवर्धन करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
व्यवहारे सर, सुधाकर बिचेवार, डॉ. उगले ,डॉक्टर गॅनचंदानी ,बागडे सर, डॉ.हिंगमीरे, आयचित सर, प्रा. अभय जोशी सर , डाॅ.बटेवार ईत्यादी अनेक गणेशभक्तांनी नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या या वृक्षरुपी पर्यावरण पूरक उपक्रमाचे मुक्तकंठाने कौतुक केले.कोरोनाच्या सावटातही गणेश भक्तांनी या उपक्रमास भरभरून प्रतिसाद दिला. लाल मातीच्या मुर्त्यांमुळे प्रदूषण टाळण्यासाठी मदत होईल , या मुर्त्या पाण्यात सहजपणे विरघळतात त्यामुळे पर्यावरणाला कोणतीही हानी होत नाही. ही बाब पर्यावरण पूरक ठरते. पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये, मातीच्या मूर्तीचा प्रसार व जनजागृती व्हावी,मूर्तीचे योग्य विसर्जन व्हावे, प्रदूषण टाळावे ,मूर्तीची विटंबना होऊ नये आदी अनेक हेतू डोळ्यासमोर ठेवून या मुर्त्यांचे वितरण करण्यात आले .
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नैसर्गिक पर्यावरण संवर्धन मानवता विकास संस्थेचे पूर्व महाराष्ट्र अध्यक्ष दिपक ठाकरे ,अमरावती विभाग अध्यक्ष प्रभाकर दिघेवार, यवतमाळ जिल्हा सचिव गजानन रासकर,मुर्तिकार आसोले यांनी परिश्रम घेतले तर उमरखेड तालुका अध्यक्ष राजेश माने, सचिव गजानन वानखेडे, देविदास कानडे ,प्रा. डॉ.अनिल काळबांडे ,रामकिसन शिंदे, कमलेश राठोड, काशिनाथ कुबडे, रवी चांदले, विजय नगरकर, साखरे सर ,सचिन कटके ,मनोज कदम ,श्रीराम बिजोरे ,बोधुजी जांगीड इत्यादींनी सहकार्य केले.

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!