कॉंग्रेसच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना शालेय पुस्तकांचे वाटप (मा मुख्यमंत्री वसंतराव नाईक व विभागाचे लोकनेते मा आमदार अनंतराव देवसरकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजन )
![](https://narishaktinews.com/wp-content/uploads/2023/07/IMG-20230703-WA1038.jpg)
कॉंग्रेसच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना शालेय पुस्तकांचे वाटप
(मा मुख्यमंत्री वसंतराव नाईक व विभागाचे लोकनेते मा आमदार अनंतराव देवसरकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजन )
उमरखेड:
हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक व उमरखेड मतदार संघाचे लोकनेते मा आमदार अनंतराव देवसरकर यांच्या जयंतीनिमित्त दि 1 जुलै रोजी शहर काँग्रेसच्या वतीने नगरपरिषदेच्या उर्दू व मराठी माध्यमातील शिकणाऱ्या वर्ग नववी व दहावीच्या गरजू विद्यार्थ्यांना 200 पुस्तक संचाचे प्रत्येक शाळेत जाऊन वाटप करण्यात आले.
वाढत्या महागाईने पुस्तकांच्या किमती गगनाला भिडल्या असल्याने गरीब घरातील विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्ण करतांना पालकांची होणारी तारेवरची कसरत दूर करण्यासाठी दि 1 जुलै रोजी हरितक्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक व विभागाचे लोकनेते माजी आमदार स्व अनंतराव देवसरकर यांच्या जयंतीनिमित्त शहर काँग्रेसच्या वतीने आयोजित नगरपरिषदेच्या शाळेतील मराठी व उर्दू मेडीयम या शाळांमधील वर्ग नववी व दहावी या वर्गात शिकणाऱ्या गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी पुस्तकांचे 200 सेट उपलब्ध करून त्यांचे वाटप प्रत्यक्ष शाळेमध्ये जाऊन करण्यात आले, यामुळे गरीब व गरजू विद्यार्थी व त्यांच्या पालकांना आपल्या पाल्यांची शिक्षण करताना येणाऱ्या अडचण दूर करण्याचा दूरदर्शी प्रयत्न काँग्रेसची युवा नेते गोपाल अग्रवाल व विभागात सक्रियपणे सामाजिक काम करणारे साहेबराव कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी काँग्रेसचे विवेक मुडे, सिद्धू जगताप , बाबू हिना , वाशिफ पठाण , सचिन गाडगे, गणेश रावते , सुनील चेके ,सोनू खतीब , गजानन रासकर, वीरेंद्र खंदारे, कुणाल श्रवले , राहुल काळबांडे, अंबादास धुळे, राजू रावते, श्रीराम बिजोरे, ईश्वर गोस्वामी,दर्शन भंडारी , अमोल पतंगराव, सुलेमान गुरु, सत्तर बाबू, जिया खतीब, शेख तवकीर, रियाज खान, शेख नय्युम, शेख ताहेर, मुसा टेलर , प्रत्येक शाळेतील शिक्षक व स्टॉप तसेच शहर काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.