उमरखेड येथे लवकरच अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय – आ.नामदेव ससाने.
उमरखेड येथे लवकरच अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय आमदार नामदेव ससाणे
उमरखेड ….
उमरखेड येथील न्यायालयात उमरखेड वकील संघ यांच्या तर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उमरखेड महागाव विधानसभेचे आमदार श्री नामदेवराव ससाने साहेब हे उपस्थित होते. सदर कार्यक्रमाच्या अनुषंगाने उमरखेड वकील बार असोसिएशन तर्फे श्री आमदार नामदेवराव ससाने साहेब यांना निवेदन देण्यात आले सदर निवेदनामध्ये उमरखेड येथे दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर स्थापन होण्याकरिता तसेच उमरखेड येथे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय तसेच दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर स्थापन होण्याकरिता उमरखेड खंड 1 मधील शेत सर्वे नंबर 26/1 मधील दोन हेक्टर जमीन मिळण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करून न्यायालय ची इमारत बांधकामासाठी परवानगी मिळवून देण्याबाबत आमदार महोदयांनी प्रयत्न करण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना आमदार श्री नामदेवराव ससाने साहेब यांनी आपल्या सर्व मागण्या एकदम रास्त असून माझ्या स्तरावरून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री महोदयांकडे तसेच शासनस्तरावर पाठपुरावा करून, लागेल त्या सर्व बाबींची पूर्तता करण्याकरिता मी सदैव आपल्या सोबत आहे , आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी मी आपल्या सोबत असल्याचा विश्वास याप्रसंगी बोलताना आमदार ससाने यांनी व्यक्त केला *या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून श्री महेशजी काळेश्वरकर, पुंडलिकराव कुबडे वकील संघाचे अध्यक्ष श्री विठ्ठल गायकवाड सचिव एनडी कदम व समस्त वकील बार असोसिएशन चे सदस्य या कार्यक्रमास उपस्थित होते*