कर्णकर्कश डीजेला विरोध – उमरखेडकरांचे पहिले पाऊल”

कर्णकर्कश डीजेला विरोध – उमरखेडकरांचे पहिले पाऊल”
आरोग्य व परंपरेच्या रक्षणासाठी डीजेला विरोध
उमरखेड :– शहरातील विविध सामाजिक, राजकीय व धार्मिक संघटनांनी एकत्र येऊन “समस्या निराकरण समाधान” या नावाने व्हाट्सअप ग्रुप स्थापन केला असून, नागरिकांच्या दैनंदिन समस्या सोडविण्यासाठी हे व्यासपीठ कार्यरत झाले आहे. याच अनुषंगाने शहर व तालुक्यातील सर्वात मोठी समस्या ठरलेल्या डीजेच्या कर्णकर्कश आवाजाविरुद्ध आज पहिलं पाऊल उचलण्यात आले.
११ सप्टेंबर रोजी तालुका प्रशासनाकडे सादर करण्यात आलेल्या निवेदनाद्वारे सण-उत्सव, मिरवणुका, विवाहसमारंभ, वाढदिवस आदी कार्यक्रमांमध्ये डीजे वापरावर संपूर्ण बंदी घालावी अशी ठाम मागणी करण्यात आली. डीजेच्या अत्याधिक आवाजामुळे विद्यार्थी, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच रुग्णांवर होणारा दुष्परिणाम अधोरेखित करत, कायदेशीर कडक अंमलबजावणी करण्याचीही मागणी करण्यात आली.
यावेळी विजय आडे, ऍड. शिवाजी वानखेडे, दिपक ठाकरे, गणेश शिंदे, राजीव देशपांडे, डॉ. धनंजय व्यवहारे, अझरउल्ला खान, जमीर खतीब, सुरेश वाघ, श्रीराम चव्हाण, प्रभाकर दिघेवार, संजय भंडारे, दिपक ग्यानचंदाणी, कैलास उदावंत, सुनील चिंचोलकर, प्रशांत आयाचित, विजय हरडफकर, साहेबराव कदम, शुद्धोधन दिवेकर, भगवान इंगळे, विजय कदम, स्वप्नील मगरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
नागरिकांचे म्हणणे आहे की, आपल्या पारंपरिक सण-उत्सवांचा आनंद शांततेत, आरोग्याला अपाय न होता आणि कायद्याचे पालन करतच व्हावा, हा या मोहिमेचा उद्देश आहे. त्यामुळे पुढील काळात उमरखेडमध्ये डीजेविरोधी मोहीम अधिक जोर धरू लागण्याची चिन्हे दिसत आहेत.
चौकट :- सर्व ग्रुपच्या च्या वतीने डीजे बंदीसाठी लोकचळवळ करण्यात येणार असुन लवकरच शहरात व तालुक्यातील नागरिकांच्या स्वाक्षरी मोहीम घेण्यात येणार आहे
असुन डीजे पासुन त्रस्त असलेल्या जनतेनी आपला पाठिंबा दयावा अशी विनंती करण्यात आली आहे