उमरखेड शहरात मोकाट कुत्र्याचा धुमाकूळ.
उमरखेड शहरात मोकाट, कुत्र्यांचा धुमाकूळ.
उमरखेड(प्रतिनिधी)
दि.24-जुलै
उमरखेड शहरातील मोकाट,व घरगुती कुत्र्यांनी धुमाकूळ घातला आहे. परिसरातील नागरिकांना अनेक वेळा कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटना
येथे काही दिवसांपासून सुरूच आहे,मोकाट कुत्र्यांचा सर्व नागरिकांना खूप त्रास होत आहे. ज्येष्ठ नागरिक,लहान मुले, मोटरसायकल यांच्यावर अचानक मोकाट कुत्री हल्ला करतात.
याची न.प. प्रशासनाने दखल घ्यावी,कुत्र्यांचा मोठा सुळसुळाट झाला असून,मोठ्या संख्येने कळपात फिरणाऱ्या या कुत्र्यांमुळे नागरिक व लहान मुलांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.
10 ते15 च्या संख्येत मोठ्या कळपस्वरूपात ही कुत्री एखादे जनावर किंवा रस्त्याने जाणा-या नागरिकांच्या गाड्यांच्या मागे लागतात,विशेषत: लहान मुले व स्त्रियांना याचा मोठा त्रास होत आहे,शहरातील भटक्या मोकाट फिरणा-या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
यामुळे परिसरात राहणा-या नागरिक, आबालवृद्ध, शालेय विद्यार्थी तसेच लहान मुलांना कधीही कुत्रे चावण्याचा धोका निर्माण होऊ शकतो,अनेक वेळा वाहन चालवणा-या नागरिकांच्या मागे कुत्रे धावतात, लहान मुले, महिलांमध्येही भीती पसरली आहे.
अनेक नागरिकांना मोकाट कुत्र्यांनी चावा घेतला आहे, तरी त्यांचा बंदोबस्त नगर परिषदेने करावा, अशी उमरखेड शहरवासीयांची मागणी आहे.