भगवती टीम च्या प्रयत्नाचे सार्थक उमेश सुकळकर ला मिळाले जिवदान – डॉ अंकुश देवसरकर.
भगवती टीम च्या प्रयत्नाचे सार्थक उमेश सुकळकर ला मिळाले जिवदान – डॉ अंकुश देवसरकर
उमरखेड –
उमेश सुकळकर हा राहणार देवड पिंपरी उमरखेड तरुण अचानक रस्ता अपघातात पेंन गंगा नदीच्या पुलावर अत्यंत गंभीर रित्या जखमी झाला..
त्याला तात्काळ नांदेड मधील एका खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले..
तिथे जवळपास अकरा दिवस व्हेंटिलेटरवर ठेवत ट्रीटमेंट घेतल्यानंतर, तशाच गंभीर अवस्थेत त्याला सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले..
परंतु, नातेवाईकांनी त्याला तिथून एकाच दिवसात काढून घेत, भगवती रुग्णालयात आणले..
भगवती रुग्णालयात आणले असता देखील त्याची प्रकृती अत्यंत गंभीर आणि धाकधुकीची म्हणता येईल अशीच होती..
नातेवाईकांनी अत्यंत विश्वासपूर्वक आमच्यावर त्याची जिम्मेदारी सोपवली..
वीस दिवस संपूर्ण अत्ययीक व आधुनिक चिकित्सेसह पेशंट व्हेंटिलेटरवर आम्ही ठेवला होता..
सर्व भगवती हॉस्पिटल टीमच्या व डॉ.अंकुश देवसरकर डॉ.राहुल देशमुख डॉ.व्यंकटेश डूबे डॉ.श्रीनिवास संगनोर अथक प्रयत्न आणि यशस्वी चिकित्सेनंतर, एकतीस दिवसांनी व्हेंटिलेटर काढत आम्ही पेशंट डिस्चार्ज केला..
आज पुनर्तपासणी पेशंट आला असता, तो स्वतः व्यवस्थितपणे बोलत असून, रोजचे सामान्य जेवण देखील व्यवस्थितपणे घेत असल्याचे त्याने सांगितले..
सोबत आलेल्या नातेवाईकांच्या भरभरून आनंदाच्या आणि समाधानी प्रतिक्रिया ऐकून सर्व भगवती टीम च्या प्रयत्नांचे सार्थक झाले.