लोहा तालुक्यातील बामणी (खराबी)येथे जाळ्यासह वृक्षारोपण: डॉ धोंडे व टीमचा पुढाकार.

लोहा तालुक्यातील बामणी (खराबी)येथे जाळ्यासह वृक्षारोपण: डॉ धोंडे व टीमचा पुढाकार
लोहा – दि
आपल्या व्यस्थ रुग्ण तपासणी तुन वेळ काढत मेंदू विकार तज्ञ डॉ प्रमोद धोंडे व त्यांची टीम गेल्या नऊ वर्षा पासून जिल्ह्याच्या व जिल्ह्या बाहेरील वेगवेगळ्या भागात विशेषतः सरकारी शाळा, दवाखाना, ग्रामपंचायत, मंदिर असा परिसरात वृक्षारोपण व त्यास जाळीचे स्वरक्षण करत असतात .यावर्षी ताकबीड सह लोहा तालुक्यातील बामणी खराबी येथे सावली व ऑक्सिजन देणारी विविध वृक्षाची लागवड करण्यात आली व त्यास जाळ्या बसविण्यात आल्या.
१३ ऑगस्ट रोजी मेंदू विकार तज्ज्ञ डॉ प्रमोद धोंडे यांनी बामणी( खराबी) या गावात जाऊन स्वतः श्रमदान करत झाडे लावली लगेच त्यास जाळ्याचे कुंपण केले .गावचे सर्पणवब पांडुरंग जाधव,संभाजीराव होळगे, किर्तीमाला संभाजी होळगे, सूर्यकांत गंदेवार, संभाजी जाधव, शहाजी जाधव, उपसरपंच खुशाल जाधव,दिगबर सूर्यवंशी, स्वयंम शिक्षण प्रयोग जिल्हा समन्वयक श्रीकांत लाडाणे यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
डॉ प्रमोद धोंडे यांनी वृक्षारोपण करण्या मागची भूमिका सांगितली गेल्या नऊ वर्षा पासून आम्ही डॉक्टर मित्र स्वखर्चातून हा उपक्रम राबवित असतो.जेथे वृक्ष लागवड केली तेथे त्या झाडांची निगा घेतली जाते की नाही याचा फालोप आम्ही घेत असतो.वड, बेल पिंपळ, कडुलिंब असे सावली देणाऱ्या व दीर्घ आयुष्य असलेली झाडे लावण्यात येतात त्याची ग्रामस्थांनी काळजी घेतली पाहिजे असे आवाहन डॉ धोंडे व टीमने केले आहे.मागील महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात नायगाव तालुक्यातही ताकबीड येथे शंभर झाडे व जाळ्या लावल्या त्यानंतर बामणी येथे वृक्षलागवडव जाळ्या लावण्यात आल्या ग्रामस्थांनी या झाडांचे संगोपन व संवर्धन करू अस डॉ धोंडे याना आश्वासित केले.