गरजेच्या वेळी ज्यांचा धावा केला जातो ते डॉक्टर म्हणजे देवच – डॉ. विजय माने.
गरजेच्या वेळी ज्यांचा धावा केला जातो ते डॉक्टर म्हणजे देवच
डॉ . विजय माने
ब्राम्हणगांवच्या आरोग्य शिबीराला उत्स्फूर्त प्रतीसाद
तज्ञ डॉक्टरांनी दिली सेवा
उमरखेड : –
संकटाच्या गरजेच्या वेळी ज्यांचा धावा केल्या जातो ते डॉक्टर म्हणजे देवच आहेत असे प्रतिपादन भाऊसाहेब माने प्रतिष्ठाणचे मार्गदर्शक डॉ . विजय माने यांनी केले आहे . ब्राम्हणगांव येथे आयोजित आरोग्य शिबीराच्या उद्घाटन प्रसंगी प्रास्तविकातून त्यांनी आपले विचार मांडले . पुढे बोलतांना ते म्हणाले की , ब्राम्हणगांव चातारीसारख्या ग्रामिण परिसरात नागरिकांना शिक्षण व आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी. आपण कमी शिकलो असलो तरी परिसरातील मुलांना उच्चशिक्षण उपलब्ध व्हावे असे स्वप्न उराशी बाळगून सन १९५० पासून शैक्षणिक चळवळ उभी केली त्याचा विस्तीर्ण विस्तार झालेला असल्याचे सांगून त्यांनी उभारलेल्या संस्थेत शिक्षण घेऊन मोठमोठ्या पदावर विराजमान झालेले तज्ञ मंडळी परिसरातील नागरिकांना सेवा देण्यासाठी हजर झाले हे याचे फलीत होय असे डॉ . माने म्हणाले व देशाचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू , क्रांती गुरु लहुजी साळवे यांच्या जयंती दिना निमित्त व माजी आमदार अँड. अनंतराव देवसरकर यांच्या पुण्यतिथी दिना निमित या प्रसंगी आदरांजली वाहिली .993 रुग्ण व नोंदणी न केलेले वेळेवर आलेले २३४ असे एकूण १२२७ रुग्ण तपासणी आणि मोफत औषधी देण्यात आली.
या कार्यक्रमाचे उद्घाटन नेत्ररोग तज्ञ डॉ . टी ए माने यांनी केले तर अध्यक्ष स्थानी सरपंच परमात्मा गरुडे , प्रमुख पाहुणे म्हणून डॉ . व्ही एन गोविंदवार, पो. पा . शिवाजीराव माने , शे . खदीर भाई ,अरविंद पाटील धबडगे, संदिप गोरे, आदिंची उपस्थिती होती . कार्यक्रमाचे संचलन प्रशांत काळे, सुनिल वानखेडे यांनी केले .
स्व . लोकनेते स्व . भाऊसाहेब माने आरोग्य प्रतिष्ठाण उमरखेड व्दारा ब्राम्हणगाव येथील तेजमल गांधी विद्यालयात दि . 14 नोव्हेंबर संपन्न झालेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबीराला पंचक्रोषीतील नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे . या शिबीरात नेत्ररोग तज्ञ डॉ . टी ए माने , छाती व फुफ्फुस तज्ञ डॉ विरेन्द्र कदम , मेडीसीन ( एमडी ) डॉ . दिपक माने , त्वचारोग तज्ञ डॉ . चंद्रशेखर किसवे , डॉ . राहुल राचेवाड , दंतरोग तज्ञ डॉ. रुपाली माने , डॉ . संतोष किसवे , डॉ विक्रांत भोसकर, पॅथालॉजी (एम डी )डॉ राजेश माने, डॉ . नकुल पिंपरखेडे, डॉ . गीता पिंपरखेडे यांनी दिवसभर आलेल्या रुग्णांची तपासणी करून सेवा प्रदान केली . हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तेजमल गांधी विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रा प्रकाश पेंटेवाड , सहशिक्षक सुधाकरराव वानखेडे यांच्या सह शिक्षक मंडळी व कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले .