सर्वसामान्य माणसाच्या मदतीला धावणारे नेतृत्व म्हणजे एकनाथ शिंदे : पालकमंत्री संजय राठोड.
सर्वसामान्य माणसाच्या मदतीला धावणारे नेतृत्व म्हणजे एकनाथ शिंदे :
पालकमंत्री संजय राठोड
उमरखेड प्रतिनिधी :
शेतकरी शेतमजूर सुशिक्षित बेरोजगार तसेच इतर सर्व सामान्य नागरिकांना केंद्रस्थानी मानुन तत्काळ मदतीला धावणारे कार्यशील नेतृत्व म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होत . असे प्रशोंशोद्गार जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी काढले .
ते आज दि. 6 ऑगस्ट रोजी स्थानिक राजस्थानी भवन येथे कार्यकर्ता संवाद मेळाव्यात मार्गदर्शन करतांना बोलत होते .
या मेळाव्याला शिवसेना जिल्हाप्रमुख श्रीधर मोहाड जिल्हा संपर्कप्रमुख हरिहर लिंगनवार माजी जिल्हाप्रमुख पराग पिंगळे .माजी जि प अध्यक्ष कालींदा पवार ,वैशालीताई मासाळ ,उपसहसंपर्कप्रमुख चितांगराव कदम ,तालुका प्रमुख प्रवीण पाटील मिराशे ,रविकांत रुडे ,संतोष जाधव ,रमेश आडे ,व्ही एन चव्हाण सविताताई कदम ,कपिल पाटील आदींची उपस्थिती होती .
झाल्यापासून एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यापासून झपाट्याने विकासात्मक निर्णय घेत अंमलबजावणी करीत आहेत त्यामुळे राज्यातील सर्वसामान्य नागरिक त्यांच्यावर जाम खुश आहेत . पक्ष बांधणीसाठी गाव तेथे शाखा घर तेथे शिवसैनिक हे धोरण राबवून गावागावात पक्षाची बांधणी करून पक्षाची ध्येय धोरणे व विकासात्मक कामे जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी शिवसेना कामी लागली आहे .
आपल्या एक वर्षाच्या कार्यकाळात मुख्यमंत्री शिंदे यांनी शेतकरी हितार्थ धोरणे राबवून .शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे व त्यांच्या त्यांना दुपटीने मदत केलेली आहे .शेतकऱ्यांना 24 तास वीज सिंचन पाणी यासह निराधारांना तसेच वृद्धांना श्रावण बाळ योजनेत पाचशे रुपयाची वाढ केलेली आहे बेरोजगारांसाठी भरीव नौकर भरती 75 हजार विविध विभागातून काढण्यात आले आहेत
पूरपिढी त्यांना पाच हजार ऐवजी दहा हजार रुपयाची वाढीव भरीव रक्कम सानुग्रह अनुदान दिलेले आहेत .जिल्हा परिषदेच्या ज्या शाळेत शंभर टक्के विद्यार्थ्यांची पटसंख्या आहेत त्या शाळांना आदर्श शाळा असे घोषित करून पुरस्कारित करण्याचे विकास निधी देण्यात येणार असल्याचे सांगितले तसेच बचत गटात गटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण करण्यात येणार असून सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानून गाव तेथे शाखा अशी पक्षाची पुढील वाटचाल असल्याने कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी पार पाडावी असे आव्हान पालकमंत्री संजय राठोड यांनी यावेळी केले