अवैद्य धंदे बंद करा नाहीतर – जिजाऊ ब्रिगेडचा आंदोलनाचा इशारा.

अवैद्य धंदे बंद करा नाहीतर जिजाऊ ब्रिगेडचा आंदोलनाचा इशारा.
उमरखेड
उमरखेड :उमरखेड तालुक्यातील मौजा बिटरगाव खुर्द या गावामध्ये मागील कित्येक वर्षापासून अवैध दारू विक्री मोठ्या प्रमाणात होत असून गावामध्ये कायदा प्रश्न निर्माण झालेला आहे. दारू गावातच मिळत असल्यामुळे लहान मुली दारूच्या आहारी गेले असून दारू पिणाऱ्यांची व विक्रेते हे महिलांना येता-जाता असशील शिवीगाळ करतात. शाळकरी मुला मुलींना त्याचा मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. बरेच कुटुंब उध्वस्त होत आहेत. काही जनावर उपासमारीची वेळ सुद्धा आली आहे आपणास विनंती गावातील दारू विक्रेता बंडू ठाकरे हा बिटरगाव गावचा दारू विक्रेता असून तो खुलेआम लोकांना चॅलेंज करतो की मला कोणाचीही भीती नाही ते अवैध दारू विक्रेते व जुगार अड्डे अवैध धंदे करून मोठ्या प्रमाणामध्ये गावातील नागरिकांना या गोष्टीचा त्रास होत आहे. या अवैध व्यवसाय करणाऱ्या वर कोणाचा वरदहस्त आहे आणि हे कोणाच्या आशीर्वादाने चालू आहे हे कळण्यास मात्र मार्ग नाही तरीही पोलीस प्रशासनाने अवैधव्यवसायिकावर कठोर कारवाई करावी अन्यथा जिजाऊ ब्रिगेड रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष सरोज देशमुख यांनी निवेदनाद्वारे पोलीस स्टेशन उमरखेड येथे तक्रार दिली आहे. यावेळी प्रतिभा मनीष नरवाडे, पार्वती मंगेश नरवाडे, संजीवनी गजानन लवांडे, सीमा दादाराव चव्हाण, ज्योती गोविंद नरवाडे वनिता दशरथ नरवाडे अर्चना पांडुरंग नरवाडे प्रणिता मारुती नरवाडे विमलबाई बंडू सूरोषे लक्ष्मीबाई जगदीश नरवाडे मीना जयवंतराव चव्हाण दिपाली जयवंत लोखंडे व अनेक महिला व पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते.