काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश समन्वयक पदी अमोल तुपेकर यांची निवड.
काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश समन्वयक पदी अमोल तुपेकर यांची निवड.
ढाणकी –
येथील सतत काँग्रेस पक्षात कार्य करणारे अध्यक्ष अमोल तुपेकर यांची महाराष्ट्र प्रदेश समन्वयक पदी निवड झाली आहे .ढाणकी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये रुग्ण कल्याण समितीचे सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिले. गोरगरिब रुग्णांसाठी सतत काम केले. कोविड कठीण काळात अनेकांच्या मदतीला धावून गेले व अशा विविध सामाजिक उपक्रमात सहभागी घेऊन सामाजिक कार्यकर्ता पासून त काँग्रेसचे शहराध्यक्ष असलेले अमोल तुपेकर यांनी कमी वेळात व कमी वयात युवकाने राष्ट्रीय काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश समन्वयक पदी या पदापर्यंत आपले यश गाठले. यांच्या या निवडीमुळे सर्वत्र कौतुक होत आहेत. त्यांनी निवडीचे श्रेय आजी-माजी लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांना दिले आहे.सामाजिक व राजकीय व प्रशासकीय सर्व मित्र परिवाराने त्यांचे अभिनंदन केले आहे.