सत्ताधाऱ्यांनी केलेले विविध घोटाळे ताकतीने जनतेसमोर मांडा – अतुल लोंढे काँग्रेस मेळाव्यात शेतकरी कुटूंबात जन्मलेल्या स्त्री कर्तृत्वाचा पुरस्कार करणाऱ्या लेखीका प्रियंका रामराव चौधरी यांच्या गाजत असलेल्या आझादी या पुस्तकामुळे नावारूपास आलेल्या तसेच पुणे व परिसरामध्ये आत्तापर्यंत 50 च्या वर ग्रंथालय डोनेट केलेल्या पुस्तकाच्या माध्यमातून निर्माण करणारी उमरखेडची कन्या प्रियांका चौधरी हिचा सत्कार आला.

youtube

सत्ताधाऱ्यांनी केलेले विविध घोटाळे ताकतीने जनतेसमोर मांडा – अतुल लोंढे

उमरखेड

(नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मेळाव्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला) उमरखेड: नगरपरीषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात होऊ घातलेल्या निवडणुकीला ताकतीने सामोरे जातांनाच विरोधकांनी केलेले भ्रष्टाचार, कचरा घोटाळा, घरकुल घोटाळा, नगरपरिषदेची केलेली आर्थिक लूट, सत्तेचा दुरुउपयोग, या मुद्यांवर जनतेमध्ये जाऊन ताकतीने सामोरे मांडा असे आव्हान काँग्रेस पक्ष्याचे प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केले यावेळी पुढे बोलतांना ते म्हणाले की काँग्रेसने 70 वर्षात देश उभा करण्यामध्ये अहम भूमिका निभावली असून देशाला जगामध्ये नवा आयाम निर्माण करण्याचे काम काँग्रेसने केले परंतु भाजपाने आठ वर्षातच देशामध्ये महागाई,बेरोजगारी व भ्रष्टाचाराने देशाची प्रतिमा मलिन करण्याचे काम केलं त्याच प्रकारे सत्ताधाऱ्यांनी केलेले नगरपरिषदेचे आर्थिक घोटाळे काढून जनतेसमोर मांडले पाहिजे तसेच कचरा खाणाऱ्यांना जनता कधीही माफ करणार नाही असा आशावाद व्यक्त केला शहराध्यक्ष नंदकिशोर अग्रवाल यांनी आपल्या प्रस्तविकात उमरखेड नगर परिषदेवर काँग्रेसची सत्ता असतांना शहरासाठी आपण केलेल्या सर्व कामांचा लेखाजोखा मांडून भविष्यामध्ये ही सर्व सुख सुविधेच्या बाबतीत समृद्ध आणि संपन्न करण्यासाठी प्रयत्नरत राहण्याची ग्वाही दिली यावेळी प्रमुख वक्ते प्रमुख उपस्थिती म्हणून मा मंत्री शिवाजीराव मोघे,मा मंत्री वसंतराव पुरके,राज्य प्रवक्ते प्रवीण देशमुख व डॉ ढोणे, जिल्हाध्यक्ष प्रफुल मानकर, विजयराव खडसे,सचिन नाईक, राम देवसरकर,युवा नेते गोपाल अग्रवाल,जावेद अन्सारी जफर खान, दत्तराव शिंदे, प्रज्ञानंद खडसे,बाळासाहेब चंद्रे, खाजाभाई, शहरातील आजी माजी पदाधिकारी, अगणित कार्यकर्ते उपस्थित होते.

चौकट

औदुंबर कन्या प्रियंका चौधरीचा सत्कार कार्यकर्ता मेळाव्यामध्ये उमरखेड येथील सर्व सामान्य शेतकरी कुटूंबात जन्मलेल्या स्त्री कर्तृत्वाचा पुरस्कार करणाऱ्या लेखीका प्रियंका रामराव चौधरी यांच्या गाजत असलेल्या आझादी या पुस्तकामुळे नावारूपास आलेल्या तसेच पुणे व परिसरामध्ये आत्तापर्यंत 50 च्या वर ग्रंथालय डोनेट केलेल्या पुस्तकाच्या माध्यमातून निर्माण करणारी उमरखेडची कन्या प्रियांका चौधरी हिचा सत्कार काँग्रेस च्या पद अधिकारी यांच्या कडून करण्यात आला व त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव पक्षाच्या वतीने करण्यात आला .

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!