विडूळ येथील मोक्षधाम परिसरामध्ये सहाशे वृक्षांची लावगड स्थानिक सामाजिक कार्यकर्ते भीमराव नगारे यांचा उपक्रम.
विडूळ येथील मोक्षधाम परिसरामध्ये सहाशे वृक्षांची लावगड स्थानिक सामाजिक कार्यकर्ते भीमराव नगारे यांचा उपक्रम
उमरखेड
तालुक्यातील विडूळ येथील मोक्षधाम परिसरामध्ये सहाशे विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड आज करण्यात आली यासाठी स्थानिक सामाजिक कार्यकर्ते भीमराव नगारे यांनी स्वतःची पदरमोड करून तसेच इतरत्र मदत घेऊन सदर वृक्षांची लागवड केली
स्थानिक सामाजिक कार्यकर्ते भीमरावजी नगारे यांनी मागील दहा वर्षापासून येथील मोक्षधाम मध्ये वृक्ष लावगड आणि त्यांचे संगोपन ते नित्यनेमाने करतात बहुतेक वेळा मोक्षधाम मध्ये उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पाण्याची उपलब्धता नसल्यामुळे नगारे यांनी स्थानिक हातपंपावरून पाणी काढून स्वतः सदरील वृक्षांना पाणी घालतात आणि झाडांचे संगोपन करतात परंतु 20000 लोकसंख्या असूनही गावातून मोक्षधाम बद्दल लोकांमध्ये कमालीची उदासीनता दिसून येते तरीही नगारे हे एकट्याने गाडा हाकत असून याबाबत त्यांना गावकऱ्यांनी सहकार्य करणे आवश्यक आहे तसेच गावातील युवा पिढीने मोक्षदाम समितीची स्थापना करून याबाबत पुढाकार घेतल्यास विड्ळ मोक्षदामाचा कायापालट होऊ शकतो त्यामुळे स्थानिक युवकांनी पुढे येऊन याबाबत सुरुवात करणे आवश्यक आहे
आज मोक्षधाम परिसरामध्ये जवळपास विविध जातीचे ६०० वृक्ष सार्वजनिक मोक्षधाम व परिसरामधे आज दिनांक . 20.08.2022 रोजी . आंबा . आवळा चिंच . शिरस . कंरज कडूलिंब पिंपळ . वड . बेहडा . बेल . आपटा . येळू . सिताफळ . कवट अशी विविधप्रकारची वृक्ष लावगड केली आहे त्यामुळे सामाजीक कार्य करणाऱ्या तरुणांनी याबाबीचा विचार करून सार्वजनीक क्षेत्रांसाठी जास्तीत जास्त योगदान देणे गरजेचे आहे
सदरील कार्यक्रम महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत व भीमराव नगारे यांच्या संयुक्त प्रयत्नातून पार पडला तसेच याप्रसंगी उपस्थितांमध्ये अमोल लामटीळे उपसरपंच . निलेश जैन . अनिल कांबळे . रामेश्वर बिच्चेवार . अरुण बेले . भीमराव नगारे . मिलींद हापसे . कैलास काळबांडे . अंकूश लामटीळे . शंकर कोत्तेवार . रवि दवणे . संजय कदम ईत्यादी उपस्थीत होते
Thanks for sharing. I read many of your blog posts, cool, your blog is very good. https://www.binance.com/cs/join?ref=P9L9FQKY