हदगाव तालुका कृषी कार्यालयाचा अनेक दिवसापासून विद्युत पुरवठा खंडित.
हदगाव तालुका कृषी कार्यालयाचा अनेक दिवसापासून विद्युत पुरवठा खंडित
हदगाव प्रतिनिधी / गजानन जिदेवार
हदगाव शहरामध्ये आझाद चौकाच्या परिसरामध्ये तालुका कृषी कार्यालय आहे
त्याच कार्यालयाचा विज बिल न भरना केल्यामुळे विद्युत पुरवठा खंडित केला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे
गेल्या अनेक दिवसापासून सातत्याने पडत असलेल्या पावसामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे
सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या पिकाचे तात्काळ पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे आदेश शासनाच्या वतीने देण्यात आले आहेत
परंतु हदगाव तालुका कृषी अधिकारी कार्यालयाचा गेल्या अनेक दिवसापासून विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे जे काही शासनाकडे अहवाल पंचनामे पाठवण्यासाठी प्रचंड त्रास होत असल्याचे कर्मचाऱ्याकडून बोलले जात आहे तर शासन म्हणते की आपण तात्काळ पंचनामे करून अहवाल पाठवा परंतु कार्यालयात विद्युत पुरवठा नसल्यामुळे अहवाल पाठवायचे कसे? हा प्रश्न कर्मचारी अधिकारी यांच्यासमोर पडला आहे याची वरिष्ठाने अधिकाऱ्याकडून दखल घेणे गरजेचे आहे