मुळावा ११ गावकरी बसले अमर उपोषणाला – ग्रामपंचायत च्या विविध समस्या साठी.

youtube

मुळावा ११ गावकरी बसले अमर उपोषणाला – ग्रामपंचायत च्या विविध समस्या साठी

[अतिक्रमण काढून व्यापार संकुल उभारण्याची मागणी ]

उमरखेड :

तालुक्यातील मुळावा येथील ग्रा.पं. हद्दीतील आठवडी बाजार , बसस्थानक , ग्रामपंचायत . कार्यालयच्या बाजुला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीतील अतिक्रमण धारकांना उठवून ग्रामपंचायतच्या हितासाठी व्यापार संकुलाच्या उभारणीसाठी , सोबतच
विविध मागण्यासह येथील 11 ग्रामस्थांनी दि .30 ऑगस्ट पासून अमरण उपोषणाला सुरुवात केली आहे .
गेल्या अनेक वर्षापासुन बेकायदेशीरपणे ताबाकरून वाहतुकीस अडथळा निर्माण करीत आहे तसेच रस्त्यावरील अतिक्रमण त्वरित उठवून सदर जागेवर ग्रामपंचायतीचे व्यापार संकुल उभारून ग्रामपंचायतीला आर्थिक सहकार्य होईल या उद्देशाने येथील 11 ग्रामस्थांनी आज सकाळी 10 वाजता पासून ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोर आमरण उपोषणासाठी संतोष आडे ,गजानन तुकाराम पत्रे, मयूर देशमुख, हरिभाऊ चव्हाण, गोविंदराज पत्रे, अविनाश शिंदे, गणपत लष्कर, मनोज राठोड, सुनील राठोड ,मंगेश खडसे, संजय पांडे , हे ११ ग्रामस्थांनी विविध मागण्यासह उपोषणासाठी बसले आहेत .
येथील ग्रामपंचायतीच्या विस्कटलेल्या प्रशासनाची घडी योग्यरीत्या बसविण्याकरिता अतिक्रमणाची मोहीम हाती घेतली आहे तसेच मुख्य रस्त्यावरून ये जा करणाऱ्यांना होणारा नाहाक त्रास नागरीकांच्या जिवावर उठले आहे .
सार्वजनीक बांधकाम विभागाच्या गलधन कारभारामुळे विद्यार्थी , जेष्ठ नागरीक , माता भगीनी यांना अतिक्रमणाचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे .
ग्रामपंचायतीच्या अंतर्गत असलेले अतिक्रमण काढून वरिष्ठांनी नियमानुसार कार्यवाही करावी असे वारंवार निवेदन देऊनही अद्यापही अतिक्रमणावर कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नसल्याने येथील त्रस्त नांगरीकांनी दि . 30 ऑगस्ट पासून आमरण उपोषणाचा निर्णय घेतले आहे
तसेच जोपर्यंत वरिष्ठ अधिकारी आमच्या मागण्यापूर्ण करणार नाही तोपर्यंत उपोषण मागे घेतला जाणार नाही असेही उपोषणकर्त्यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले …

Google Ad
Google Ad

2 thoughts on “मुळावा ११ गावकरी बसले अमर उपोषणाला – ग्रामपंचायत च्या विविध समस्या साठी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!